Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro : PM मोदींचा मुंबईत रोड शो, मेट्रोसेवा काही वेळ राहणार बंद; आताच करा प्रवासाचे नियोजन

PM Narendra Modi Road Show: ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोसेवा बंद राहणार असल्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहानंतर मेट्रो प्रवास करणे टाळावे.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. घाटकोपरमध्ये त्यांचा रोड शो होणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई मेट्रो (Mumbai Metro) बंद राहणार आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासून घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रोसेवा बंद राहणार आहे. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोसेवा बंद राहणार असल्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहानंतर मेट्रो प्रवास करणे टाळावे.

जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा ६ वाजल्यानंतर बंद राहणार आहेत. वर्सोवावरून ५.३० वाजता निघणारी मेट्रो घाटकोपरला जाणारी शेवटची असणार आहे. ही मेट्रो ५.५३ वाजता घाटकोपर रेल्वे स्थानकावर पोहचेल. संध्याकाळी ५.३० वाजता निघणाऱ्या मेट्रो जागृतीनगरला असेल. त्यानंतर पुढच्या मेट्रो घाटकोपर ते जागृतीनगर स्थानकादरम्यान बंद राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोसेवा बंद राहणार आहे. जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो स्थानकांदरम्यान संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे अशी माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पीएम मोदींच्या रोडशोला विक्रोळी येथून सुरूवात होणार आहे. या रोड शोसाठी महाराष्ट्र सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोदी ज्या मार्गावरून रोडशो करणार आहेत त्या मार्गावर ठिकठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातील वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ड्रोन, फुगे आणि पतंग उडवण्यास बंदी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Rajasthan: बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

Sunidhi Chauhan: सुनिधी चौहान Live कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना अचानक रडू लागली, नेमकं काय घडलं?

Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

SCROLL FOR NEXT