Sanjay Raut Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Political News : लोकसभा अध्यक्षपद भाजपकडे गेल्यास 3 मोठे पक्ष फुटतील, संजय राऊत यांनी थेट नावंच सांगितली

Sanjay Raut Latest News : लोकसभा अध्यक्ष झाल्यावर सरकार ज्यांच्या टेकूवर उभे आहे, त्या चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, नितीश कुमार यांचे पक्ष ते फोडतील", असं संजय राऊत यांनी म्हटलंय

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर देशात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली असून ७२ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडलाय. आता २६ जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसंदर्भात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय.

लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार चंद्रबाबू नायडू यांनी उमेदवार दिला, तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्वाचं असून राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपचे एजंट म्हणून काम केले होते".

"त्यांनी बनावट निकाल दिला होता. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा अध्यक्ष झाल्यावर होऊ शकतो, असं राऊत म्हणाले. लोकसभा अध्यक्ष झाल्यावर सरकार ज्यांच्या टेकूवर उभे आहे, त्या चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, नितीश कुमार यांचे पक्ष ते फोडतील", असा आरोप राऊत यांनी केला.

"ज्याचे खावे मीठ, त्याची मारावी नीट ही भाजपाची परंपरा आहे. यामुळे चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले असल्याचे आम्हाला समजले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या उमेदवार लोकसभा अध्यक्षपदासाठी उभा राहिल्यावर त्याला आम्ही पाठिंबा देऊ. तसेच आमचे सर्व नेते पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा करतील", असंही राऊत म्हणाले.

"देशाच्या जनतेने मोदींना झिडकारले, नाकारले आहे. भाजपाचा, त्यांच्या झुंडशाहीचा, हुकुमशाहीचा आणि संविधानविरोधी कृतीचा पराभव केला आहे. आता मोदींचा तामझाम राहिलेला नाही. ते टेकूवर बसले असून तो कधीही कोसळू शकतो. राहुल गांधी यांनीही हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल असे म्हटले आहे", असेही खासदार राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

SCROLL FOR NEXT