Lok Sabha Election Saam TV
मुंबई/पुणे

Lok Sabha Election :मुंबईतील १० जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात; अद्यापही मविआ आणि महायुतीत काही जागांवर तिढा कायम

Political News : महामुंबईतील १० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी देखील अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

मुंबईसह ठाणे, पालघरच्या १० जागांसाठी आजपासून (शुक्रवार) अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य यांसह ठाणे, भिवंडी आणि कल्याण या १० लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची दिनांक ३ मे आहे. ३ मेपर्यंत या १० जागांसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

महामुंबईतील १० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी देखील अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. दक्षिण मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर महायुतीचा या जागेसाठीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. अशात आज ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समजलं आहे.

मुंबईत उमेदवारांना या ठिकाणी अर्ज भरता येणार

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य या तीन जागांसाठी प्रशासकीय इमारत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय यासह मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय, मुंबई दक्षिण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय विक्रोळी (पूर्व) त्याचप्रमाणे मुंबई दक्षिण मध्य, गोदरेज कॉलनी येथे उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे.

निवडणूक वेळापत्रक

२६ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात

३ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार

४ मेला सर्व अर्जांच छाननी होणार

६ मे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

२० मे मतदान प्रक्रिया पार पडणार

४ जून मतमोजणी होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला येणार ₹१,५००; ऑगस्ट हप्त्याची नवीन अपडेट समोर

Heart Attack : रात्री झोपताना हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? नकळत तुमच्याकडून होणाऱ्या ३ चुका कारणीभूत

IIT मुंबईत विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली; प्रशासनाविरोधात विद्यार्थी आक्रमक, रात्रभर कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन

Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कुठे कसा राहील पावसाचा अंदाज? कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी इशारा

SCROLL FOR NEXT