Nandurbar Crime: नवापूरमधील लाचखोर पीआयला अटक; नाशिक एसीबीची कारवाई; नागरिकांची पोलीस गाडीवर दगडफेक
Nashik ACB Department Arrested Navapur Police InspectorSaam Tv

Nandurbar Crime: नवापूरमधील लाचखोर पीआयला अटक; नाशिक एसीबीची कारवाई; नागरिकांची पोलीस गाडीवर दगडफेक

Nandurbar Crime : लाचखोर पोलीस निरीक्षकाला अटक केल्यानंतर जमावाने पोलीस कारवर दगडफेक केल्याची घटना नवापूर येथे घडलीय. लाचखोर पीआय खोटे गुन्हे दाखल करणं आणि गुन्हे दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
Published on

सागर निकवाडे

Nashik ACB Department Arrested Navapur Police Inspector: नंदूरबार: आरोपीला अटक न केल्याप्रकरणी लाच मागणारे नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना अटक करण्यात आलीय. नाशिक एसीबीकडून ही कारवाई करण्यात आलीय. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी यांनी दीड लाखाची मागणी केली होती. दरम्यान अटकेची कारवाई केली असताना जमावाकडून अधिकाऱ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक वारे यांनी आरोपीवर अटकेची कारवाई न करण्याकरता दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील १ लाख दिले गेले होते ५० हजार दिले जात असताना नाशिक एसीबीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेंना रंगेहाथ अटक केली.

पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई होताच शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत पोलीस वाहनावर दगडफेक केली. पोलीस निरीक्षक वारे हे वारंवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते. तर भ्रष्ट अधिकारी होते, त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला. पोलीस निरीक्षक वारे यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी

गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची घटना काही दिवसापूर्वी दहिसमध्येही घडली होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी १० लाखांची मागणी करणारा दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने अटक केली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईत दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे याच्यासह लाचेच्या रक्कमेपैकी एक लाख स्वीकारणारा खाजगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Nandurbar Crime: नवापूरमधील लाचखोर पीआयला अटक; नाशिक एसीबीची कारवाई; नागरिकांची पोलीस गाडीवर दगडफेक
Pune Crime News : पोलीसांची धाड, तो जीव मुठीत घेऊन पळाला; इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पाय घसरला अन् मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com