Mahayuti (BJP, Shivsena Eknath Shinde Group,NCP Ajit Pawar Group) Seat Sharing Saam Tv
मुंबई/पुणे

Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? अमित शहा तोडगा काढणार, फॉर्म्युला कसा असणार?

Mahayuti Seat Controversy: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीवारी करणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर तिन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार आहे.

Satish Daud

Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. दुसरीकडे महायुतीत देखील जागावाटपावरून खल आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जास्त जागा मिळाव्यात म्हणून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीवारी करणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर तिन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम चर्चा करणार आहे. (Breaking Marathi News)

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा देखील उपस्थित राहणार आहे. जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर बैठकीत ४८ लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे.  (Breaking Marathi News)

अगदी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सविस्तरपणे चर्चा केली आहे.

महायुतीत मनसे एक किंवा दोन जागा द्यायच्या असेल, तर त्या कोणत्या द्यायच्या या संदर्भातला निर्णय आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत होणार आहे. शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा सोडायच्या याचाही अंतिम निर्णय आज होणाऱ्या बैठकीत होणार आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत महायुतीचे उमेदवार जाहीर केले जातील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

Dashavatar Collection : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा बोलबाला; दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं केली जादू, २ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT