Sanjay Raut: देशात लोकशाही नाही, कुणालाही अटक होऊ शकते; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरुन संजय राऊत संतापले

Sanjay Raut Latest News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. देशात लोकशाही नाही, कुणालाही अटक होऊ शकते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut criticizes BJP
Sanjay Raut criticizes BJPSaam TV

Sanjay Raut criticizes BJP

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली. शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. देशात लोकशाही नाही, कुणालाही अटक होऊ शकते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut criticizes BJP
Today's Marathi News Live: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? आज महत्वाची बैठक

"भारतात लोकशाही उरली नसून जंगलराज सुरू आहे. रशियात जसं पुतिन यांचं राज सुरू आहे, तेच पॅटर्न भारतात देखील सुरू आहे. याला गुजरात पॅटर्न म्हणतात", अशी खोचक टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली.

"अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. केजरीवाल यांच्याकडे दिल्ली विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. भाजपला तिथे ५ जागाही मिळालेल्या नाही. यामुळेच भाजपचा तिळपापड होत आहे", असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. (Breaking Marathi News)

"कंसाला ज्याला ज्याची भीती होती, त्यांना सर्वांना त्याने तुरुंगात टाकले. अगदी देवाला देखील तुरुंगात टाकले होते. शेवटी त्याचं तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला. या देशामध्ये देखील तिच परिस्थिती आहे. आमच्या कंस मामाला सर्वांची भीती वाटत असून विरोधातील लोकांना ते तुरुंगात टाकत आहेत", अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

"अरविंद फार्मा कंपनीने सर्वात जास्त फंडिग आम आदमी पार्टीला नाही, तर भाजपला केली आहे. पण जेलमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया संजयसिंग यांना पाठवलं आहे. हा नेमका कोणता कायदा आहे, कोणते सविधान आहे, तुम्ही चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम करत आहात, आमचे सरकार आले तर कोण जेलमध्ये जाते ते बघू", असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

Sanjay Raut criticizes BJP
Buldhana News: मुख्याध्यापिकेकडून ८ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com