अमित शाह यांच्या उपस्थित महायुतीची अंतिम बैठक
त्यानंतर महायुतीची महाराष्ट्रात संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता
नवनीत राणा यांना भाजप मधे प्रवेश करावा लागणार ?
नवनीत राणा जर भाजपच्या चिन्हावर लढल्या नाहीत तर भाजप दुसरा उमेदवार देणार
भाजपकडून इतर काही उमेदवारांची चाचपणी
भाजपच्या वरिष्ठ नेत्याची माहिती
महाविकास आघाडीच्या वतीने अमरावती लोकसभेसाठी दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेस चे आमदार बळवंत वानखडे यांना दोन दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर करण्यात आली, नवनीत राणा यानी हनुमान चालीसा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांचा अपमान केला. त्यामुळे नवनीत राणा यांना यांचा पराभव करण्यासाठी ही उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावी, असा आग्रह आज शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावून धरला होता.
सातारा पुणे महामार्गालगत असणाऱ्या सुरुर गावाजवळ केमिकल घेऊन निघालेल्या टँकर ने घेतला अचानक पेट...
टँकर ने पेट घेतल्याने वाहतूक काही काळ थांबवली...
टँकर वीजवायचे प्रयत्न सुरू आहेत.
थोड्याच वेळात उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतील
इथून ते दोघे अमित शाह यांच्या भेटीला जातील
मनसेला लोकसभा निवडणुकीत NDA मधे जागा मिळणार
मनसेला १ किंवा २ जागा मिळण्याची शक्यता
दक्षिण मुंबई मतदार संघ मनसेला देण्यावर जवळपास शिक्कमोर्तब
हे सर्व. रक्कम आयकर खात्याकडे जमा केली ते या प्रकरणी चौकशी करत आहेत
मुंबईत सर्बरन भागात सर्वात जास्त पैसे जमा केली 3 कोटी रूपय जमा केले
राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दरम्यान राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाला विरोध करत मराठा समाजाच्या वतीने सगे सोयराची अमलाबजावी करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं ही मागणी लावून धरलीय. त्यांतच निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडनुका जाहीर करत.राज्यसह देशात आचार संहिता लागू केलीय. याचं पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये उद्या सकाळी दहा वाजता महा बैठकीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार आहे.
हिंगोलीच्या वसमतमध्ये जमिनीच्या वादातून औषध विक्रेत्याला ४ ते ५ जणांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता गावठी पिस्तुल मारून औषण विक्रेत्याचे डोके देखील फोडले. या घटनेत गौरव तांबाळे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तांबाळे यांच्या आईला देखील आरोपींनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. यासंदर्भात वसमत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबजवळ एक भयानक घटना घडली.
भरधाव वेगात असलेल्या एका कारला अचानक भीषण आग लागली.
या घटनेत कारमधील ४ प्रवासी होरपळले असल्याची माहिती आहे.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आगीत होरपळलेले चारही व्यक्ती नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
यवतमाळ येथून शनिवारी ते नागपूरच्या दिशेने जात होते, त्यावेळी ही घटना घडली.
शाॅटशर्किटमुळे आग लागल्याची पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा
होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली
राहुल गांधी एका बाजूला भारत जोडोचं नाटक करतात, दुसरीकडे काँग्रेस भारत तोडोची भाषा करणाऱ्यांना तिकीट देतंय. अकोलातून काँग्रेस पठाण यांना उमेदवारी देत आहे. त्यांच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसची अशी भूमिका दिसते. गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा, हे धोरण काँग्रेसचं दिसतंय, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पश्चिम बंगाल (West Bengal) :
महुआ मोईत्रा यांच्या कोलकात्यातील घरी सकाळपासून सीबीआयची छापेमारी सुरू
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा केला होता महुआ मोइत्रा यांच्यावर आरोप
अनेक ठिकाणांवर झाडाझडती
माढा लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रासपचे नेते महादेव जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
महादेव जानकरांच्या उमेदवारीमुळे महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचा मार्गही सोपा झाला आहे.
त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि राम राजे निंबाळकर गटाची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.
भाजपचे कार्यकर्ते निंबाळकरांच्या विजयासाठी सरसावले असून मोहिते पाटील हे १२ एप्रिल रोजी आपली भूमिका जाहीर करणार आहे. (Maharashtra Loksabha Election)
महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे जागा वाटप रखडलं?
ठाकरे गट २२ जागांच्या लढवण्यावर ठाम असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी.
ठाकरे गटाच्या आक्रमकतेमुळे मुंबईतील तीन जागा, तर पश्चिम महाराष्ट्रातील एका जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची सूत्रांची माहिती
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंच्या आक्रमकपणाची तक्रार थेट दिल्लीकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा तिढा काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीने सुटण्याची शक्यता आहे.
रशियाच्या मॉस्को शहरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी आहेत.
या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
कठीण प्रसंगात रशियन सरकारच्या सोबत आहोत, असा दिलासाही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर महायुतीच्या उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. आज किंवा उद्या युतीच्या फॉर्मुल्याची घोषणा होणार असून काही काही जागांची अदलाबदल होण्याची देखील शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.