Ajit Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Lok Sabha पराभव, एनडीए, काँग्रेस, कापूस, सोयाबीन; शेती ते राजकारण सगळ्याच विषयांवर अजित पवार दिलखुलास बोलले

NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शेती ते राजकारण सगळ्याच विषयांवर दिलखुलासपणे बोलले आहेत.

Satish Kengar

सुनील कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

''काँग्रेसमध्ये त्रास होऊ लागल्याने पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली'', असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शेती ते राजकारण सगळ्याच विषयांवर दिलखुलासपणे बोलले आहेत.

अजित पवार म्हणाले आहेत की, ''काळ वेळ कुणासाठी थांबत नाही, बघता बघता २५ वर्ष झाली. पक्ष स्थापन करताना आपल्या लोकांना संधी, कशी मिळेल याची चर्चा झाली. तेव्हा सोनिया गांधी यांचा परकीय‌ मुद्दा पुढं केला गेला. मग पक्ष स्थापन केला.'' यावेळी शरद पवार यांचं नाव घेत अजित पवार म्हणाले की, ''गेली २४ वर्ष पवार साहेबांनी जे नेतृत्व पक्षाचे केले त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो.''

ते म्हणाले की, ''अनेकांनी पक्षवाढीसाठी काम केलं. वेगळा पक्ष स्थापन केला तेव्हा आपल्या ५८ जागा आल्या. काँग्रेसच्या ७८ जागा आल्या होत्या. आपण सर्व घटकांना बरोबर संधी दिली. लोकसभेला सर्वांचे अंदाज चुकले, मी ही बोललो काय निकाल लागेल, हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही.

अजित पवार म्हणाले, ''लोकसभेला ज्या गोष्टी राहिल्या, त्या आता पूर्ण केल्या पाहिजे. वर नेते एकत्र असतात, पण खालच्या पातळीवर कार्यकर्ते एकमेकांविरोधात लढतात. ती उणीव भरुन काढण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, ''महायुतीत आपण असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर ही विचारधारा आपण सोडलेली नाही. विरोधक चुकीचा नरैटीव्ह सेट करत होते,ते यशस्वी झाले. सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधानांनी संविधानाला वंदन केलं. पाच वर्ष आता एनडीएचं सरकार असणार आहे. चंद्रा बाबू, नितीश कुमार यांनी सांगितलं, आम्ही एनडीए सोडणार नाही. पण विरोधक सांगतात आता एनडीए टिकत नाही, हे नेरेटिव्ह आहे, एनडीए मी सांगतो 300 च्या वर जाणार आहे.''

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची फक्त एकच जागा निवडून आली आहे. याचबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, ''पराभवाची जबाबदारी मी घेतो. जे घटक बाजूला गेले त्यांना बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. मतांची टक्केवारी बघा ४३.९० टक्के मत महाविकास आघाडीला पडली, आपल्याला ४३.३० टक्के मतं‌ पडली. म्हणजे फक्त अर्धा टक्का फरक होता. काही ठिकाणी आरक्षणाचा फटका बसला.'' कापूस, सोयाबीनबरोबर कांद्यानं रडवलं, उत्तर महाराष्ट्रात अनेक जागा कांद्यानं ‌पाडल्या, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT