मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचदरम्यान, लोकपोलचा सर्व्हेने राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीला राज्यात किती जागा मिळतील, या आकडेवारीचा अंदाज लोकपोल सर्व्हेतून समोर आला आहे.
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोक पोल' सर्व्हेत महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला १४१-१५४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इतर राजकीय पक्षांच्या झोळीत पाचहून १८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीला ३८-४१ टक्के, महाविकास आघाडीला ४१-४४ टक्के आणि इतर पक्षांना १५-१८ टक्के मतदान मिळू शकतं.
महायुती
115 ते 128
मविआ
141ते 154
इतर
5 ते 18
महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विधानसभेत १४५ ची मॅजिक फिगर मिळवावी लागते. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे. तर महाविकास आघाडीतील पक्ष विरोधात बसले आहेत.
लोकपोलच्या सर्व्हेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी विदर्भात सरस दिसत आहे. तर महायुती कोकणात बाजी मारताना दिसत आहेत. विदर्भात ६२ जागांपैकी महायुतीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला ४० ते ४५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी महायुतीला २० ते २५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला २० ते २५ या सारख्याच जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठाणे-कोकणातील ३९ जागांपैकी २५ ते ३० जागा महायुतीला दाखवण्यात आल्या आहेत. तर ५ ते १० जागा महाविकास आघाडीला दाखवण्यात आल्या आहेत.
मुंबईतील ३६ जागांपैकी १० ते १५ जागा महायुतीला दाखवण्यात आल्या आहेत. तर महाविकास आघाडीला २० ते २५ जागा दाखवण्यात आल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांपैकी २० ते २५ जागा महायुतीला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मराठवाड्यात महाविकास आघाडी जड पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी १५ ते २० जागा महायुतीला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २५ ते ३० जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.