LOHAGAD FORT HERITAGE ROW: MOUNTAINEERS OPPOSE 'SIYA POINT' NAME, SEEK GOVERNMENT INTERVENTION 
मुंबई/पुणे

केतनच्या हत्या प्रकरणानंतर 'सिया पॉइंट'ची क्रेझ; लोहगडची ओळख कायम ठेवा, गिर्यारोहकांची मागणी

Lohagad Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा'ने महाराष्ट्र सरकारला लोहगड किल्ल्याची ऐतिहासिक ओळख जपण्याचे आवाहन केले आहे. किल्ल्यावरील एका कड्यासाठी 'सिया पॉइंट' (Siya Point) या नावाच्या वापरास आक्षेप घेतला आहे.

Akshay Badve

  • लोहगडावरील एका कड्याचा "Siya Point" असा उल्लेख

  • अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या नामकरणाला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

  • सरकारने हस्तक्षेप करून लोहगडचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व जपावे.

केतन अग्रवाल खून प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून लोहगडावरील एका कड्याचा "Siya Point" असा उल्लेख समाजमाध्यमांवर आणि काही डिजिटल माध्यमांमध्ये केला जातोय. याच गोष्टीला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने विरोध करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. लोहगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा तो साक्षीदार असून लाखो शिवप्रेमी यांच्यासाठी तो श्रद्धेचे स्थान आहे अशा गडाची ओळख एखाद्या दुर्दैवी गुन्हेगारी घटनेशी जोडणे, त्या ठिकाणाला नवीन नाव देणे किंवा त्यावर मीम्स, रील्स करणे आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा अवमान असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

"Siya Point"सह सर्व आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे डिजिटल उल्लेख तात्काळ हटविण्यात यावेत तसेच Google Maps आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चुकीची नामकरणे रद्द करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

सिया पॉइंट' हे नाव इंटरनेटवर लोकेशन म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे. यामुळे लोहगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्याची आणि जागतिक वारसा स्थळाची बदनामी होतेय. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केलीय. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यासाठी पत्र लिहलं आहे.

स्थानिक नागरिक, इतिहासकार आणि शिवप्रेमींनी अशा नावांचा वापर थांबवण्याची मागणी केली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार राहिलेला लोहगड किल्ला अशा गुन्ह्यांमुळे बदनाम होऊ नये. दरम्यान या हत्याकांडामुळे राज्यभरातील लोकांमध्ये लोहगड किल्ल्याबाबत एक चुकीचा समज निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खट्याळ नजर अन् काळजात भिडणारं सौंदर्य; श्रृतीला मराठेला पाहून चाहते झाले घायाळ

Weight Loss: थकून गेलाय पण वजन कमी होत नाही? पाण्यात 'हा' १ पदार्थ मिसळून प्या, चरबी मेणासारखी वितळेल

Maharashtra News Live Update: वसईत मुसळधार पावसाचा फटका; संरक्षण भिंत कोसळून 12 दुचाकींचे मोठे नुकसान

साप चावला तर सर्वात आधी करा 'हे' १ काम; हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत वाचू शकतो जीव

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले; वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT