BMC election  Saam Tv
मुंबई/पुणे

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

EVM वरुन संशयाचं वादळ उठलं असताना निवडणूक आयोगाने पालिका निवडणूकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे या निर्णयावरुन नवा वाद पेटलाय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत..ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे... मात्र या निवडणूकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीय..मात्र निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांनी थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावण्याचा इशारा दिलाय...

खरं तर मतदारांनी ज्या उमेदवाराला EVM वर मतदान केलं आहे. त्याच व्यक्तीला मतदान झालं आहे का? हे व्हीव्हीपॅटवर दिसून यायचं. बोगस मतदान आणि EVM छेडछाडीचा संशय दूर कऱण्यासाठी अत्यंत महत्वाचं असलेल्या व्हीव्हीपॅट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरण्यात येणार नाही... मात्र व्हीव्हीपॅटचा वापर नेमका कसा होतो? पाहूयात....

EVM आणि कंट्रोल युनिटच्या मध्ये VVPAT चा वापर

EVM चं बटण दाबताच मतदाराला 7 सेकंदासाठी VVPAT वर स्लिप दिसते

या स्लिपवर ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याचं नाव आणि चिन्ह दिसते

7 सेकंदानंतर ही स्लिप खालील बॉक्समध्ये जमा होते

मतमोजणीच्या वेळी VVPAT मधील स्लिप मोजल्या जातात

खरंतर 2017 पासून सर्वच निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येत आहे... मात्र आधीच EVM वरुन देशभरात गोंधळ उडालेला असताना आता आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचं स्पष्ट केलंय.. त्यामुळे आयोगाचा निर्णय वादात सापडणार, हे मात्र निश्चित......

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT