Mhada Scam : म्हाडामध्ये मोठा घोटाळा; मास्टरलिस्टमध्ये आढळली १५ बनावट नावे, गाळे बळकावले

Mumbai Crime news : म्हाडामध्ये मोठा घोटाळा झालाय. म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये १५ बनावट नावे आढळली आहेत.
MHADA scam
MhadaSaam tv
Published On
Summary

म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये 15 बनावट नावे आढळली आहेत

१३ बनावट रहिवाशांना प्रत्यक्ष गाळे देण्यात आले आहेत.

खेरवाडी पोलीस ठाण्यात १९ बनावट रहिवाशांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत घर घेणं आता दिवास्वप्न झालं आहे. मुंबईतील घरांच्या किंमती कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक मुंबईत घर, गाळे घेण्यासाठी 'म्हाडा' संस्थेवर अवलंबून असतात. मात्र, याच म्हाडामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस झालं आहे. म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये १५ बनावट नावे आढळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये बनावट नावे घालून सदनिकांचा लाभ घेण्याचा प्रकार दक्षता विभागाच्या चौकशीत उघड झाला आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात १९ बनावट रहिवाशांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. या नागरिकांची नावे मास्टर लिस्टमध्ये बनावट पद्धतीने घुसवणाऱ्या म्हाडा अभियंत्यांवर मात्र अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समोर आलंय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

MHADA scam
Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

सुरेश चिकणे यांच्या यादीत १५ बनावट नावे आढळून आली आहे. त्यातील १३ जणांनी प्रत्यक्ष सदनिका मिळवल्या आहेत. तर मूळ यादीत नसलेल्या नावांना पात्र ठरवून गाळे देण्यात आले. मात्र ही नावे कशी आणि कोणाच्या मर्जीने यादीत आली, याचा ठोस उल्लेख नाहीये. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा उल्लेख नाही.

MHADA scam
Maharashtra Politics : महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ; अचानक दिल्लीवारी वाढल्या, पडद्यामागं काय राजकारण घडतंय?

बनावट यादी, मूळ दस्तऐवजांची न पडताळलेली छाननी आणि समितीच्या हलगर्जीपणामुळे शासनाची फसवणूक झाली आहे, हे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तरी यामागील अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींना पाठीशी घालण्यात आले आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

MHADA scam
Maharashtra Cabinet : समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडणार; फडणवीस सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय,वाचा

कारवाई होणार का?

मास्टर लिस्टमध्ये बनावट नावे घुसवणाऱ्या रहिवाशांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर आता मास्टरलिस्टमध्ये बोगस नावे घुसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com