Maharashtra Politics : महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ; अचानक दिल्लीवारी वाढल्या, पडद्यामागं काय राजकारण घडतंय?

Eknath shinde News : महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारी देखील वाढल्या आहेत.
Eknath shinde
Eknath shinde News Saam tv
Published On

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षात मोठे बदल होताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नेत्यांनी पक्षप्रवेशाचा धडाला लावला आहे. मात्र, भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात अडचण निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे महायुतीत अस्वस्थ असल्याचे बोललं जात आहे.

Eknath shinde
Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

'सकाळ'च्या वृत्तानुसार, महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची खदखद बाहेर पडण्याची शक्यता आहे. जालन्याचे काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांनी शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात निवडणूक लढवली होती.

राज्यात गोरंट्याल यांच्याबरोबर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये मोठ्या संख्याने भाजपमध्ये एन्ट्री केली आहे. शरद पवार गटाच्या राहुल मोटे हे देखील अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राहुल मोटे यांनी शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या विरोधात निडवणूक लढवली होती.

Eknath shinde
Mumbai Crime : दवाखान्यात शिरला, गोड बोलून सोन्याचा कडा घेतला; भोंदूबाबानं भरदिवसा डॉक्टरला लुटलं, VIDEO

एकनाथ शिंदे यांचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत, त्याच मतदारसंघातील आमदारांच्या विरोधातील उमेदवारांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बळ दिलं जात आहे, असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. महायुतीमधील या समन्वय बैठकीत एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath shinde
Nishikant Dubey on Thackeray Brothers : ठाकरे बंधू संपणार, मुंबईत केवळ 30 टक्के मराठी; निशिकांत दुबे पुन्हा बरळले, VIDEO

दोन दिग्गज नेत्यांचे पक्षांतर

काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. वरपूडकर यांनी अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

शरद पवार गटाचे माजी मंत्री अण्णा डांगे, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

डांगे यांना धनगर समाजाचा महत्वाचा नेता मानले जाते. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपमधील आधीच असलेल्या धनगर समाजाच्या नेत्यांना एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com