नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; अत्यंत अश्लील भाषेत धमकी
नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; अत्यंत अश्लील भाषेत धमकी Saam TV
मुंबई/पुणे

नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; अत्यंत अश्लील भाषेत धमकी

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना धमकीचे पत्र आले आहे. नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र पाठवले आहे. नवाब मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. नवब मलिक यांना रेप करण्याची धमकी देण्यात आली असून, गप्प बसा नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू अशा आशयाचा मजकूर त्या पत्रात लिहिला आहे. संबंधीत पत्र मुंबईतील कफ परेड इथे राहणार्‍या अभिजित बनसोडे याने पत्र पाठवले आहे. मात्र पत्र पुण्यावरून पोस्टाने आले असल्याने बोगस नावाने पत्र पाठवले असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे मागच्या अनेक दिवसांपासून समीर वानखेडे यांच्या पाठीमागे लागले आहेत. समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात पैसे मागितल्याचा आरोप मलिकांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मलिक दररोज पत्रकरा परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडे आणि आर्यन प्रकरण नवनवीन खुलासे करायला लागले. त्याच अनुषंगाने मलिकांना पत्र आले आहे. समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलणे थांबवा असेही त्या पत्रात म्हटले आहे. आता मलिकांनी या संबंधीत तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे.

आज लागलेल्या निकालावर देखील मलिकांनी आपली बाजू मांडली. अकोला आणि नागपूरचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यात मतदान करत असतात त्यामुळे यात घोडेबाजार होतो हे स्पष्ट आहे. यात पैशांचा वापर केला गेला आहे. हे कुठे तरी थांबलं पाहिजे या दृष्टीने आम्ही पावलं टाकू, पैसे घेऊन क्रॉस मतदान होत आहे, विधानपरिषद निवडणुकीत उघड मतदान व्हावे यासाठी संसदेत कायदा व्हायला हवा असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Today's Marathi News Live: बीडमध्ये तिहेरी अपघातात; 1 ठार तर 3 जण जखमी

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT