Ajit Pawar
Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Vidhan Parishad Election: चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय हे उभा महाराष्ट्र बघेल: अजित पवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: जे उमेदवार २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्या उमेदवारांची विकेट पडेल. सोमवारी कोण चमत्कार घडवतो हे उभा महाराष्ट्र बघत आहे, सर्वच पक्ष या निवडणुकीत प्रयत्न करत आहे. अपक्ष आमदारांना फोन केले आहेत, राष्ट्रवादीला (NCP) थोड्या मतांची गरज आहे. आमच अंतरमन आम्हाला सांगतय ती मते आम्हाला मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचे सहावी उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमचे दोन आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान न करता आल्यामुळे आमची दोन मत कमी झाल्याचेही पवार म्हणाले. आता विधानसभेसाठी त्यांना परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, विधान परिषदेसाठी आघाडी म्हणून आम्ही ६ उमेदवार उभे केले आहेत. आम्ही सर्वजण हे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनेकडे २ उमेदवार निवडून येतील यासाठी पुरेसी मते आहेत, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीकडे पुरेसे मते नाहीत. कोटा जास्त कसा देता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. राज्यसभा निवडणुकीचा (Election)आम्हाला अनुभव आहे. आमचे आमदार आम्ही हॉटेलमध्ये एकत्र आणले आहेत. सर्व आमदारांना मत कसे द्यायचे याची माहिती दिली जाणार आहे.

फोन केले आहेत, त्यांनासुद्धा मत कमी पडत असताना त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. शिवसेनेचा पाठींबा देणारे अपक्ष आमदार सुद्धा मुख्यमंत्री ज्याप्रकारे म्हणतील तसे मत करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. बविआचे तीन मते आहेत, त्यांना आमच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला आहे. हितेंद्र ठाकूर यांना आमचे नेतेसुद्धा भेटले आहेत. क्षितिज ठाकूर परदेशात आहेत. त्यामुळे ते येतात की नाही माहीत नाही, असंही पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT