Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Pankaja Munde Rally: बीडमधील चिंचाळा गावात आपल्या प्रचारार्थ सभेत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील बोलून दाखवली. प्रीतम मुंडे यांना तिसऱ्यांदा खासदारकीची संधी मिळावी, असं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलंय.
Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा
Pankaja Munde Rally Saam Tv
Published On

Pankaja Munde Rally In chinchala Beed :

लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना भाजपने अनेक बदल केलेत. बीडमध्येही प्रीतम मुंडेंना डच्चू देत पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. राज्यातील राजकारणात डावलल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देत भाजपने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिल्लीपेक्षा राज्यातील राजकारणात राहण्यास अधिक इच्छुक असल्याचं दिसत आहेत. आपल्याच एका प्रचारसभेत बोलतांना पंकजा मुंडे यांनी आपल्यातील मनातील इच्छा बोलून दाखवलीय.

खरं तर मी इथेच पाहिजे तुमची काळजी घेण्यासाठी. मात्र मी तिथं गेले तरी मी तुमची काळजी घेईल. मोबाईल टॉवर देखील लांबून रेंज देते, असं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे त्या दिल्लीपेक्षा राज्यातील राजकारणात राहण्यात त्या अधिक इच्छुक असल्याचं जाणवलं. तर केंद्रात प्रीतम मुंडे गेल्या पाहिजे होत्या, अशी इच्छा पंकजा मुंडे यांनी चिंचाळा येथे बोलून दाखवली. खासदार प्रीतम ताईंचे देखील चांगलं चाललं होतं. प्रीतम ताईंची हट्रिक व्हावी, अशी माझी इच्छा होती असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

खासदार प्रीतम ताईंचे देखील चांगलं चाललं होतं. प्रीतम ताईंची हट्रिक व्हावी, अशी माझी इच्छा होती. आता निवांत नाही बसायचं, डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवायचं. आपल्याला एकदा दूध पोळलंय आता ताकही फुंकून प्यायचं. यावेळी बोलताना त्यांनी परत एकदा आपल्या पराभवाच्या सल बोलून दाखवली. मला 5 वर्ष घरी बसवलं? मात्र पंकजा मुंडे घरी बसल्यावर काही अडलं का? तुम्हाला भरपूर निधी मिळाला का? या पाच वर्षात माझं काही वजन कमी झालं नाही. पण तुम्हाला निधी मिळाला का, असा सवाल पंकजा मुंडेंनी केला.

आपण पालकमंत्री असताना अनेक विकासकामे केली. आज जिल्ह्यात काम करत असतांना मी कधीच हा विचार केला नाही की, या गावात कोण राहतं. समोरील व्यक्ती कोणत्या जाती आणि कोणत्या धर्माची आहे, हे पाहिलं नाही. मी फक्त एकच पाहिलं अंगामध्ये लाल रक्त असणारा माणूस राहतो का? आणि त्याला मदत केली त्याचा विकास केला. एका व्यक्तीला मोठ्या प्रमाणात पीक विमा दिल्याचं सांगत आपलं राजकीय जीवनात काही चुकलं का असा सवालही पंकजा मुंडेंनी केला. आपल्या कार्यकाळात हा जिल्हा मी टँकर मुक्त केलं.

जलशिवार योजना ही माझीच संकल्पना होती. या जिल्ह्यात मी पालकमंत्री म्हणून सर्वात काम चांगले काम केलं. त्याचमुळे लोक माझ्या पाठिशी आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुण्यश्लोक आहिल्याबाई देवी सारखं काम केलं. राज्यभरातील मंदिराने मोठा निधी पुरवला. पण नंतर मला ५ वर्ष संघटनेनेच काम करत बसावं लागलं. प्रीतम मुंडेंचेही चांगलं चालू होतं. सर्वांना भेटी देत होत्या. त्यांची यंदाही संधी मिळेल असं मला वाटलं होतं. पण नाही यंदा मला उमेदवारी दिली. कारण भावी नेत्यांची संघटना तयार झालीय. तसं आमच्याकडे भावी लोकांची संघटना होऊ नये म्हणून त्यांनी मला दिल्लीत पाठवून दिलं.

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा
Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com