प्रवीण दरेकरांची लोकल स्ट्रॅटर्जी; आमदारांना भेटण्यासाठी ट्रेनने प्रवास

२० जून रोजी निवडणूक होणार आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSaam Tv

मुंबई: विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातील ही निवडणूक (Election) बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपने आता अपक्ष आमदारांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन रवाना लोकलने प्रवास करत रवाना झाले आहेत.

सर्वच पक्षांनी अपक्ष आमदारांच्या भेटगाठी सुरू केल्या आहेत. प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गिरीष महाजन यांनी आज वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये, म्हणून विरारसाठी लोकलने प्रवास केला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

Pravin Darekar
PM Modi : "माझी आई दुसऱ्यांच्या घरची भांडी धुवायची"; पंतप्रधानांची आईबाबत भावुक पोस्ट

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) व आमदार गिरीश महाजन हे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला चर्चगेट स्टेशनहून लोकल ट्रेनने विरार करीता रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सोबत आमदार मंगेश चव्हाणही आहेत.

Pravin Darekar
राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत खलबते; शरद पवारांनी विरोधकांची बोलवली बैठक

शिवसेना हायअलर्टवर, दगाफटका केला तर कारवाई होणार

राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर झालेल्या पराभवामुळे शिवसेनेने आता कडक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने (Shivsena) आता आपल्या आमदारांना हायअलर्टवर ठेवले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणतीही चूक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. ते कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी जर कोणत्या आमदाराने मतदान करताना चूक केली, तर कडक कारवाई करणार असल्याचे सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. एखाद्या नेत्याने दगाफटका केल्यास कारवाई होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले होते, त्यांनी ही चूक जाणीवपूर्वक केली होती का, अनावधानाने झाली होती, याची चौकशी करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एका मतामुळे पराभव झाला आहे, त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) हायअलर्टवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com