राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत खलबते; शरद पवारांनी विरोधकांची बोलवली बैठक

१८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे.
Presidential Election 2022, Sharad Pawar
Presidential Election 2022, Sharad PawarSaam Tv
Published On

मुंबई: भारतीय निवडणूक (Election) आयोगाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. यासाठी देशातील विरोधी पक्षांनी चांगलीच तयारी सुरू केली आहे. या संदर्भात काही दिवसापूर्वी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर दिल्लीत या निवडणुकी संदर्भात खलबते सुरू झाली आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी बाबत देशात चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस (Congress) तसेच अन्य पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पसंती दर्शवली होती, पण शरद पवार यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. आज शरद पवार दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात बैठक घेणार आहेत. (Presidential Election 2022)

Presidential Election 2022, Sharad Pawar
राष्ट्रपती निवडणुकीवर मुंबईत खलबते; शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक

निवडणुकीची (Election) घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा, बैठकांना सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी उमेदवारीला नकार दिला. सत्ताधारी गोटातही उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे.

काही दिवसापूर्वीच शरद पवार यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भेट घेतली होती. शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरावा अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनीही या संदर्भात मागणी केली होती, पण शरद पवार यांनी उमेदवारीला नकार दिला आहे.

Presidential Election 2022, Sharad Pawar
शरद पवारसाहेब राष्ट्रपती झाले तर आमचा उर भरून येईल - छगन भुजबळ

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार न करता विरोधी युपीएचे अध्यक्ष पद देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रपती निवडणुकीवरुन आता देशात बैठका सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे भाजुपनेही उमेदवार चाचपणीस सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com