मुंबई : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शाळा सुरु करण्याच्या नियमांबाबत गोंधळाची परिस्थिती असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम असून याबाबत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याशी चर्चा झाली आहे. 1 डिसेंबरपासून शाळा (School) सुरू करण्याबाबत निर्णय झाला तेव्हा नवा विषाणू नव्हता मुलांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. काही जणांनी 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करायच्या म्हणत होतो मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे. 'मुंबईचा कायदा वेगळा आणि इतर महापालिकांचा कायदा वेगळा आहे' असही अजित पवार शाळांबाबतच्या निर्णयावरुन म्हणाले.
हे देखील पहा -
तसेच या ओमायक्रॉन (omicron) वरुन केंद्र सरकराचे आणि आपल्या नियमावतील थोडीशी तफावत होती, मात्र एकसारखे नियम असावेत परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले तर एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केला असून आता नियमांमधील तफावत दुर केली असल्याच सांगत देश म्हणून एक नियम असायला हवेत असंही ते म्हणाले.
दरम्यान अजित पवारांनी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना केंद्राने मुदतवाढ नाकारली असल्याचही सांगितलं ते म्हणाले. 'आता मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांना नियुक्त केली आहे. मुख्य सचिवांना मुदतवाढ द्यायची असेल तर सर्व राज्यांना तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो. माझ्या माहितीनुसार केंद्र सरकारकडे तीन राज्यांचे प्रस्ताव गेले होते. त्यातील दोन राज्यांच्या मुख्य सचिवांना 3 महिन्यांची मुदवाढ मात्र कुटेंना मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची नियुक्ती त्याच दिवशी सल्लागार म्हणून केली आहे. यापूर्वी अजय मेहता (Ajay Mehta) यांना दोनदा केंद्र सरकारने (Central Goverment) तीन महिन्यांच मुदतवाढ दिली होती. आता का झालं, कशामुळे झालं याबाबत माझी कुणाशी चर्चा झालेली नीही त्यामुळे आपणाला माहित नसल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.