Mumbai : ओमायक्रॉनचं भान ठेऊनच.. महापरिनिर्वाण दिनी दर्शन; महापौरांच स्पष्टीकरण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्य भूमीवरती त्यांचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी आणि ओायमाक्रॉनच या दोन्हीच्या (Onicron) पार्श्वभूमीवरती एक बैठक घेण्यात आली होती.
Mumbai : ओमायक्रॉनचं भान ठेऊनच.. महापरिनिर्वाण दिनी दर्शन; महापौरांच स्पष्टीकरण
Mumbai : ओमायक्रॉनचं भान ठेऊनच.. महापरिनिर्वाण दिनी दर्शन; महापौरांच स्पष्टीकरणSaamTV
Published On

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्य भूमीवरती त्यांचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी आणि ओायमाक्रॉन या दोन्हीच्या (Omicron) पार्श्वभूमीवरती आपण एक बैठक घेतली होती. या बैठकीत सगळेच प्रतिनिधी उपस्थित होते. आपण दरवर्षी सगळं उत्तम नियोजन करत असतो. चैत्यभूमीवर सगळ्यांना दर्शन मिळेल मात्र ओायमाक्रॉनच भान ठेऊन दर्शन मिळणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pedanekar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हे देखील पहा -

चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) दर्शनासाठी रांगा लागतील, तसेच येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी शौचालय व्यवस्था, शेडची व्यवस्था, तसेच त्या परिसरात फुलांची आरास सुरांचं अभिवादन अशी सर्व व्यवस्था नेहमीप्रमाणे करण्यात येणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

Mumbai : ओमायक्रॉनचं भान ठेऊनच.. महापरिनिर्वाण दिनी दर्शन; महापौरांच स्पष्टीकरण
पॅरालीसीसचा उपचार घेणाऱ्या वृद्धाला रुग्णालयात चावल्या मुंग्या; गुप्तांगसह डोळ्यांना जखमा (पहा Video)

दरम्यान सर्वांना ओायमाक्रॉनच भान ठेऊन दर्शन मिळेल येणाऱ्या अनुयायांना पोट भर सुकं अन्न दिलं जाईल. जवळ राहणाऱ्या अनुयायांना विनंती आहे, त्यांनी कृपया नंतरही दर्शन घेऊ शकतील. पण दूरच्या अनुयायांना आधी दर्शन घेऊ द्यावं. तसेच 5 तारखेच्या रात्री पर्यंत व्यवस्था केली जाईल. दूरदर्शन च्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्षेपण (Online) केलं जाईल. कोरोनाच्या नियमांचं पालन करण बंधनकारक राहणार असल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com