Gautami Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Gautami Patil : गौतमी पाटील पुन्हा चर्चेत; भर कार्यक्रमात मुलाला उचललं अन्..., VIDEO तुफान व्हायरल

आपल्या हटके डान्सच्या शैलीनं गौतमीने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घातली आहे.

Shivani Tichkule

Gautami Patil Viral Video :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. आपल्या हटके डान्सच्या शैलीनं गौतमीने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घातली आहे. जिथे पाहा तिथे गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला नागरिकही तुफान गर्दी करत आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या डान्सचा आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडीओमध्ये गौतमी पाटील एका मुलासोबत डान्स करताना दिसत आहे. गौतमीने स्टेजवर डान्स करताना गौतमीने एका मुलाला बोलावून त्याच्या सोबत डान्स केला आहे. आता हा मुलगा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा मुलगा अजून कोणी नसून एक लहान मुलगा आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी त्या मुलाला मांडीवर घेऊन त्याला किस करताना दिसत आहे. याच लहान मुलासोबत डान्स करतानाचा गौतमीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

गौतमी तिच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. पुण्यातील एका कार्यक्रमात गौतमीने एका लहान मुलाला आपल्या मांडीवर बसवून त्याच्यासोबत डान्स केला आहे. या दोघांचा डान्सचा करतानाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पसंती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते, असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला होता. गौतमीच्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरलही झाली होती.

कोण आहे गौतमी पाटील?

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही लावणी डान्सर आहे. ती मूळ धुळे जिल्ह्यातील असून तिचा जन्म सिंधखेडा या गावात झाला. गौतमी तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे.

गौतमीच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली. त्यानंतर तिने नृत्याचं शिक्षण घेतलं. सुरूवातील तिने छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सहकलाकार म्हणून काम केलं. मात्र, त्यानंतर तिच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताच तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT