Dharavi Redevelopment google
मुंबई/पुणे

Dharavi Redevelopment Survey: धारावीच्या सर्वेक्षणाचा नवा उच्चांक!

Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाने नवा टप्पा गाठत वरच्या मजल्यावरील घरांसह ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी तळ मजला आणि व्यावसायिक गाळ्यांसह करण्यात आलेल्या ६० हजार सर्वेक्षणाचा टप्पाही आता ओलांडला गेला आहे.

Saam Tv

मुंबई, मार्च २५: धारावी पुनर्विकास प्रकल्पात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा सध्या गाठण्यात यश आले आहे. धारावीत २००७-०८ मध्ये निवासी घरे आणि व्यावसायिक गाळ्यांचे दस्तऐवजीकरणाचे काम पार पडले होते. मात्र, सध्या पार पडलेल्या सर्वेक्षणाने, हा सुमारे ६० हजार तळ मजल्यावरील भाडेकरूंसह गाळ्यांच्या झालेल्या सर्वेक्षणाचा आकडा ओलांडला गेला आहे. साधारणतः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त तळ मजल्यावरील भाडेकरूंना गाळ्यांना मोफत घरांसाठी पात्र मानले जाते.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास याबद्दल म्हणाले की, "आमच्या सर्वेक्षणाने एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. ही सरकारसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. हा पुनर्विकास प्रकल्प केवळ तळ मजल्यावरील भाडेकरूंपुरता मर्यादित नसून, वरच्या मजल्यांवरील बांधकामांचाही या समावेश होतो. यातून असं साध्य झालं की, सरकार सगळ्यांना घरं देण्यासाठी बांधील आहे. धारावीत कोणीही वंचित राहणार नाही."

नवीन सर्वेक्षणानुसार, ९५ हजारांहून अधिक गाळ्यांचे गल्लीबोळात जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ८९ हजारांहून अधिक गाळ्यांना क्रमांक देण्यात आला आहे. तसेच ६३ हजारांहून अधिक गाळ्यांचे घराघरात जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले. मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळ मजल्यावरील भाडेकरूंची घरे, वरच्या मजल्यांवरील बांधकामे, सध्याच्या अस्तित्वातील एसआरए इमारती, आरएलडीए जमिनीवरील झोपडपट्टीवासी नागरिक, तसेच सर्व धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

श्रीनिवास याबद्दल पुढे अधिक बोलताना म्हणाले की, "आपण येथे प्रचंड संख्येतील भाडेकरूंबद्दल बोलत आहोत. तसेच, आता आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या आकड्यांतून स्पष्टपणे कळते की धारावीकर पुनर्विकासाच्या बाजूने आहेत. त्याचबरोबर ते सर्वेक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत. तरीही, आम्ही सर्व रहिवाशांना लवकरात लवकर सर्वेक्षणात सहभाग घेण्याचे आवाहन करतो आहोत. जेणेकरून पुढील टप्पे सुरू करता येतील. ज्या रहिवाशांनी सर्वेक्षणात भाग घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकरात लवकर स्वेच्छेने या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. यामध्ये ज्या भाडेकरुंनी किंवा रहिवाशांनी सहभाग घेतला नसेल. तसेच कागदपत्रे सादर केली नसतील तर त्यांच्या घरांचे इथून पुढे सर्वेक्षण पुन्हा केले जाण्याची शक्यता कमी आहे."

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (एनएमडीपीएल), विशेष उद्देश कंपनी तर्फे सुमारे 1 लाख ५० हजार घरांच्या सर्वेक्षणाची तयारी केली गेली आहे. कारण बहुतेक झोपड्या या तळमजला अधिक दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढल्या आहेत. ज्यामुळे पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढली आहे.

या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत भाष्य करताना, एनएमडीपीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि याचा आम्हाला आनंद आहे. अद्याप सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या रहिवाशांना लवकरात लवकर पुढे येण्याचे आम्ही आवाहन करतो. धारावीकरांकडून आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांची सकारात्मकता आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची इच्छा या पुनर्विकास प्रकल्पाला पुढे नेण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल. आम्ही त्यांच्या या जिद्दीला सलाम करतो. त्यांचा स्वतःच्या तसेच भविष्यातील पिढ्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा आम्ही निश्चितच आदर करतो."

सर्व पात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच केले जाणार आहे. या वसाहतीत चांगल्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयी उपलब्ध असतील. या नव्या वसाहती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) तयार होतील. त्यामध्ये मेट्रोसह इतर चांगल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT