Human Body Part Found Near Kalamb Village in Indapur Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळला अर्धा कापलेला पाय, स्थानिकांचा थरकाप उडाला

Human Body Part Found Near Kalamb Village in Indapur: पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब गावातील एका हॉटेलजवळ अर्धा कापलेला मानवी पाय आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.

Bhagyashree Kamble

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलपासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर एका पुरूषाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास स्थानिकांना हा अर्धा पाय आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. हा पाय नेमका कुणाचा आहे? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत कळंब नीमसाखर रोडवर घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस स्टेशनचे हाऊस ऑफिसर राजकुमार डुंगे हे घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर पडलेला मानवी पायाचा भाग हा पुरूषाचा आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी हॉटेलच्या काही अंतरावर अर्धा कापलेला पाय आढळला. पायात मोजे देखील दिसत आहे. हा पाय एका पुरूषाचा असल्याची माहिती आहे. मात्र, हा पाय नेमका कुणाचा आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच माहिती समोर येईल.

स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, सकाळी काही लोक परिसरात बाहेर फिरायला गेले होते. त्यांना हॉटेलच्या बाहेर तुटलेला पाय दिसला. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाय दिसल्यानंतर याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींना लुटलं, मुंबईतील बड्या बिल्डरचा कारनामा उघड

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

KL Rahul: 358 रन्स करूनही भारताच्या पदरी पराभवच; 'या' खेळाडूंवर केएल राहुलने फोडलं खापर, म्हणाला, मी स्वतःला दोष देतोय कारण...!

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT