Pune Crime News
Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: विद्यार्थ्याने अभ्यासिकेतच घेतला गळफास; चिठ्ठीत सांगितलं मृत्यूचं कारण

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

Pune News: पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका विद्यार्थ्याने वसतिगृहात आपलं जीवन संपवलं आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नांगरे (वय २१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विजय बी.ए.चे शिक्षण घेत होता. अभ्यासिकेत वाचनासाठी तो आला होता. मात्र येथे आल्यावर त्याच्या डोक्यात भलताच विचार आला. अभ्यस करण्याऐवजी त्याने स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

विजयने अभ्यासिकेत असलेल्या पंख्यालाच गळफास घेतला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात तो राहात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने आत्महत्येआधी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. विजय हा गेले काही दिवस डिप्रेशनमध्ये होता.

अभ्यासिकेत विद्यार्थी सातत्याने आपला अभ्यास करत असतात. या अभ्यासिकेतही कायम गर्दी असते. रात्रीच्यावेळी देखील काही विद्यार्थी येथे अभ्यास करतात. त्यामुळे विजयने पहाटेच्या वेळी येथे जाण्याचा निर्णय घेतला. पहाटे पाचच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

सकाळी काही विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आल्यावर त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विजयने गळफास घेतल्याचे पाहताच संपूर्ण इमारतीत एकच गोंधळ निर्माण झाला. उपस्थित विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विजयचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या आधीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

विजयने या आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने या आधीही भीमा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विजयने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madness Machayenge : 'बाहुबली ३ मध्ये रोल मिळाला का?'; कालकेयच्या लूकमध्ये अभिनेत्याला पाहून नेटकऱ्याची भन्नाट प्रतिक्रिया

Kadaknath Chicken: कडकनाथ कोंबडी काळी असण्याचं कारण नेमकं काय?

Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT