Badlapur Crime news Saam Tv
मुंबई/पुणे

महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिसऱ्या मजल्यावरुन उडी, तपासात आत्महत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

Tragedy in Badlapur: बदलापूर पश्चिमेत महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगे (३६) यांनी आत्महत्या केली. तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

  • बदलापूर पश्चिमेत महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगे (३६) यांनी आत्महत्या केली.

  • तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

  • कौटुंबिक वाद व मानसिक नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती.

  • पोलिसांनी एडीआर दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

बदलापूर पश्चिममधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. २९ ऑगस्टच्या रात्री महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. बदलापूर पश्चिमेतील वेदांत नक्षत्र या इमारतीतून या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. तिसऱ्या मजल्यावरून महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. महिलेची हत्या आहे की आत्महत्या? याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी वारिंगे (वय वर्ष ३६) असे महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ड्युटीवरून त्या रात्रीच्या सुमारास घरी परतल्या. घरी परतल्यानंतर त्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच काही वेळातच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बदलापूर पश्चिम पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. मात्र, अद्याप कुटुंबियांच्या घरातून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.

वारिंगे यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादातून त्यांना नैराश्य आलं होतं. मानसिक तणावात ते जगत होते, अशी माहिती समोर आली आहे. याच नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या का केली? याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : साहिबजादा फरहानची गोळीबारची अॅक्शन, राऊतांची मोदी सरकारवर जोरदार टीका |VIDEO

Maharashtra Live News Update: औषधे आजपासून होणार स्वस्त

New Highway: मुंबईत तयार होतोय आणखी एक महामार्ग, नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर प्रवास फक्त अर्ध्या तासात

Ankita-Vicky Photos : हॉस्पिटलमधून नवरा घरी आल्यावर अंकिताने शेअर केला फोटो, नेटकऱ्यांना आठवले 'मानव-अर्चना'

Maharashtra Politics: अमोल मिटकरी माझे 'गुरु', त्यांच्यामुळेच विधानसभेला काठावर निवडून आलो - माणिकराव कोकाटे|VIDEO

SCROLL FOR NEXT