
आईच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत धनंजय साखळकर आंदोलनात सहभागी.
समाजासाठी काम करा, ही आईची इच्छा होती.
वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मराठा आरक्षण लढ्यात सहभाग.
आंदोलन संपल्यानंतर उर्वरित विधी करण्याचा निर्णय.
कौटुंबिक दु:ख बाजूला ठेवून एका मराठा तरूणानं मराठा आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. घरात आईचे चार दिवसांपूर्वी निधन झाले होते. कौटुंबिक दुःख बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी तरूण मुंबईत आला. समाजाचा झेंडा खांद्यावर घेत माळशिरस तालुक्यातील तरूणानं थेट मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनस्थळ गाठलं. सध्या या तरूणाचं विशेष कौतुक होत आहे.
ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक मराठा पेटून उठला आहे. राज्यातील विविध भागातून मराठा बांधवांनी मुंबई गाठली. आझाद मैदानावर आज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. मराठा बांधवांनी एकजूट होत मुंबई गाठली असून, भगवं वादळ पाहायला मिळत आहे.
मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यामुळे ते सुरूवातीला मुंबईत जाऊ शकले नाहीत. मात्र, आईच्या निधनानंतर तीन दिवसांचे विधी पार पडल्यानंर साखळकर यांनी मुंबई गाठली.
त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी साखळकर यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला ' माझ्या आईने नेहमी समाजासाठी पुढे राहा, असं सांगितलं होतं. तिची हीच खरी इच्छा होती. म्हणूनच मी या आंदोलनात सहभागी झालोआहे', असं साखळकर म्हणाले.
आंदोलन संपल्यानंतर आईचे उर्वरित विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक दु:खावर मात करत समाजासाठी लढा देणाऱ्या त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.