Pune-Mumbai land scam worth lakhs of crores details :  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Massive Pune-Mumbai Land Scam? पुणे आणि मुंबईतील लाखो कोटींच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश! विरोधकांचा आरोप – सत्ताधारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार फोफावला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरणाची माहिती.

Suprim Maskar, Namdeo Kumbhar

Pune-Mumbai land scam worth lakhs of crores details : पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरु असताना विरोधकांनी पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा होत असल्याचा आरोप केलाय... त्यामुळे सत्ताधारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीतून भूखंडाचं श्रीखंड नेमकं कोण खातयं? भूखंड लाटण्याचा हा प्रकार नेमका कधीपासून सुरु झाला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

सध्या पुणे आणि मुंबईत भूखंड घोटाळे गाजत आहेत....सत्येच्या वळचळणीला जाऊन हजारो कोटींचे भूखंड सर्रास लाटले जात आहेत...या भूखंडा घोटाळ्यात सत्तेत असलेल्या मंत्र्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचेच नावं पुढे येत आहेत...यात पहिलं गाजलेलं पुण्यातलं जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीचं प्रकरण आणि हे कमी होतं की काय त्यापाठोपाठ काही दिवसांतच पार्थ पवारांचा जमीन व्यवहार वादात सापडला. एकट्या पुण्यात १ लाख कोटीपेक्षा जास्त जमीन घोटाळे असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर मुंबईत आरक्षण बदलून हजारो कोटींच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यात येत असल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय.

राज्यात यापूर्वीही भूखंड घोटाळे गाजले आहेत. मात्र त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे. भूखंड घोटाळ्याप्रकरणी याआधी कोणत्या नेते अडचणीत आले होते ते पाहूयात...

1998 साली मनोहर जोशींना पुण्यातील शाळेचा आरक्षित भूखंड जावयाला दिल्याच्या आरोपामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 2016 साली एकनाथ खडसेंना भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणात मंत्रिपद सोडावं लागलं. मंत्री संजय शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष असताना 5 हजार कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप...पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ वादात

एकेकाळी छगन भुजबळ, फडणवीस याच्याकडून राजकीय नेत्यांवर भूंखडांचं श्रीखंड लाटल्याचा आरोप केला जायचा...मात्र आता त्यांच्याच सरकारमध्ये भूखंड घोटाळ्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत. सत्तेचा गैरवापर करून बिल्डर आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीतून पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये लाखो कोटींचे भूखंड सर्रास लाटले जात आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता या दुष्टचक्रातून या शहरांची कधी सुटका होणार हा खरा प्रश्न आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

SCROLL FOR NEXT