Kalyan Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: जमिनीच्या वादातून काका-पुण्यात तुंबळ हाणामारी, एकमेकांची डोकी फोडली; थरकाप उडवणारा VIDEO

Kalyan Police: कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून काका-पुतणे एकमेकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांची डोकी फोडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

Summary:

  • कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून तुंबळ मारहाण झाली.

  • काका-पुतण्याने एकमेकांना बेदम मारहाण केली

  • दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांवर दगडफेक देखील केली.

  • या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला तर तिघे किरकोळ जखमी झाले.

  • घटनेचा CCTV व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून काका-पुतण्यामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. दोघांच्या कुटुंबियांना एकमेकांना मारहाण करत दगडफेक केली. त्याचसोबत लोखंडी हत्याराने वार देखील केले. ही घटना कल्याणनजीकच्या शहाडमध्ये घडली. या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून राडा झाला. या हाणामारीत पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण करण्यात आली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेत ३ जण जखमी झाले असून विनोद दत्तात्रेय कोट हा गंभीर जखमी झाला आहे. विनोद हा हा आपल्या आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहत असून त्याचे काकांसोबत गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरु आहे.

शनिवारी सायंकाळी विनोदच्या घराच्या टेरेसवर त्याचे वडील दत्तात्रेय कोट हे साफसफाई करत होते. त्याच्या काकांना वाटले की टेरेसवर पाण्याची टाकी बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. काका विष्णू कोट, काकू लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या हाणामारीदरम्यान विनोदच्या काकांनी लोखंडी टोकदार हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केले. यानंतर दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये ३ जण किरकोळ जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor scandal: 'दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेला...', प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप, रडत म्हणाली...

Diwali 2025 Astrology: १०० वर्षानंतर दुर्मिळ योग, दिवाळीपासून या 3 राशींचे नशीब बदलणार, मोठा धनलाभ होणार

Walmik Karad: वाल्मीक कराड जेलमध्ये, पण बाहेर पैशाची मागणी; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, बॅनरवर मुंडे बहीण-भावाचा फोटो

Maharashtra Live News Update : रोहिणी खडसेंना पुणे पोलिसांची नोटीस

PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

SCROLL FOR NEXT