Crime News: बहीण आणि पत्नीचं भांडण सोडवायला गेला; संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

Wife Cuts Husband’s Private Part: छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील लैलूंगा विधानसभा मतदारसंघातील बनकेला गावात एक भयानक घटना घडलीय. संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याचा गुप्तांग कापला.
Wife Cuts Husband’s Private Part
Shocking incident from Chhattisgarh’s Raigarh: Wife cuts husband’s private part after family quarrel.saam tv
Published On
Summary
  • छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात धक्कादायक घटना.

  • बहीण आणि पत्नीच्या वादात पती मध्यस्थी करायला गेला.

  • संतापलेल्या पत्नीने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील लैलूंगा विधानसभा मतदारसंघातील बनेकेला गाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. बायको आणि बहिणीच्या वादात पडणं एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलंय. दोघांचेस भांडण सोडवणाऱ्या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट त्याचा बायकोनेच कापून काढलाय.

अनिल राठिया (वय ३३) असं या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी आणि बहिणीमध्ये भांडण होत होते ते सोडवण्यासाठी त्याने मध्यस्थी केली. पण संतापलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यावर क्रूरपणे हल्ला करत त्याचे गुप्तांग कापून टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीच्या पत्नीचे वय अंदाजे ३० वर्ष आहे. शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी तिचे त्याच्या बहिणीशी काहीतरी कारणावरून वाद झाला. अनिल राठिया यांनी आपल्या पत्नीला शिवीगाळ करण्यापासून रोखलं. तिला दूर ढकलून शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र वाद आणखीच वाढला. तेव्हा रागाच्या भरात पत्नीने पती अनिलला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने वार केला. तिने राठियाच्या गुप्तांगावर हल्ला करत त्याला कापून टाकले. या घटनेनंतर तो तरुण वेदनेने थरथर कापत जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी जखमी अनिलला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अनिल राठिया हा तरुण गवंडीचं काम करतो आणि त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या चांगले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. त्यांनी भांडणाचा आवाज ऐकून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती लैलुंगा पोलीस ठाण्यालाही देण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीविरुद्ध मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

या घटनेचा माहिती देताना डीएसपी सुशांतो बॅनर्जी म्हणाले, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी अनिल राठिया घरी आले. तेव्हा त्यांनी त्यांची पत्नी आणि बहिणीला वाद घालताना पाहिलं. अनिल राठिया यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतापलेल्या पत्नीने अनिल राठिया यांचे प्रायव्हेट पार्ट कापून टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com