Lalbaug Raja Ganesh Visarjan Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत ५० मोबाईलसह अनेकांचे दागिने लंपास; पोलिस स्टेशनसमोर भक्तांची रांग

Ganpati Visarjan 2022 News : या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती.

प्रमिल क्षेत्रे

मुंबई: मुंबईतील लागलबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई (Theft) केली आहे. लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तूंची चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती. (Mumbai Crime News)

राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई-पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. तर मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. गेली दहा दिवस लोक दर्शनासाठी रांगा लावत होते, पण आज गणपती बाप्पाला निरोप देतावेळी पोलिस स्थानकाबाहेर रांगेत उभे वेळ गणेश भक्तांवर आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेलेल्या वस्तूंची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली. तक्रार नोंदवून घेण्यासाठी भक्तांनी पोलिस स्थानकाबाहेर रांगच लावली होती. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांचीही दमछाक झाली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT