Lalbaugcha Raja Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या! भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचं विसर्जन

गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी
Lalbaug Raja Ganesh Visarjan
Lalbaug Raja Ganesh VisarjanSaam Tv
Published On

मुंबई - राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई (Mumbai) पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. तर मुंबईतील लागलबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.

कोरोनाच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. गेल्या 10 दिवसांपासून गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईतील प्रसिद्ध नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं (Lalbaug Raja) विसर्जन झालं. राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित झाले होते.

आज सकाळी समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली. त्यांनतर खोल समुद्रात भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.

विसर्जन मिरवणुकीत तब्बल 50 फोन अन् दागिन्यांची चोरी!

मुंबईतील लागलबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली. लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तु चोरले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती.

Lalbaug Raja Ganesh Visarjan
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अ‍ॅरॉन फिंचची 'या' फॉरमॅटमधून निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे.गेली दहा दिवस लोक दर्शनासाठी रांगा लावत होते, पण आज गणपती बाप्पाला निरोप देतावेळी पोलिस स्थानकाबाहेर रांगेत उभे वेळ गणेश भक्तांवर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेलेल्या वस्तूंची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली. तक्रार नोंदवून घेण्यासाठी भक्तांनी पोलीस स्थानका बाहेर रांगच लावली होती. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांचीही दमछाक झाली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com