Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Lalbaug Visarjan 2025 : लालबागचा राजा ५ तासांपासून गिरगावच्या चौपाटीवर, विसर्जनाला उशीर का? समोर आलं कारण

Mumbai News : मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जनात विलंब झाला आहे. समुद्रातील भरती आणि नव्या अत्याधुनिक तराफ्याच्या वापरामुळे विसर्जनात अडचणी येत आहेत. भाविक अजूनही गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Alisha Khedekar

  • लालबागच्या राजाच्या विसर्जनात २३ तासांचा विलंब

  • समुद्रातील भरती आणि पावसामुळे विसर्जनाची प्रक्रिया अडखळली

  • यंदा पहिल्यांदाच अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्याचा वापर

  • भाविक अजूनही गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची आतुरतेने वाट पाहत आहेत

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव थाटामाटात पार पडला आहे. पाच दिवसांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर काल ११ दिवसांच्या गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र मुंबईची शान आणि कोळीबांधवांचा नवसाचा राजा म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन अद्यापही झालेले नाही. मुंबईत सुरु असलेली पावसाची रिपरिप आणि उसळलेल्या लाटांमुळे राजाचं विसर्जन करण्यात अडचणी येत असल्याचं म्हटलं जात आहे.

काल अनंत चतुर्दशी दिवशी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला. दरवर्षी मुंबईतील मोठ्या आणि ११ दिवसांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला निघते. आणि त्याचं रात्री बऱ्याच मंडळातील गणपतींचे विसर्जन होते. तसेच लालबागच्या राजाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी होते. मात्र आज सकाळी ८ वाजता लालबागचा राजा मुंबईतील गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. २३ तास उलटले तरीही अद्याप त्याचे विसर्जन झालेले नाही.

यावर्षी राजाच्या विसर्जनासाठी गुजरातवरून अत्याधुनिक तराफा मागवण्यात आला आहे. मात्र समुद्रात भरतीची वेळ असल्याने राजाच्या विसर्जनात अडचणी निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरती येऊन जात नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार नाही आहे. ओहोटी येण्यासाठी आणखी ३ तासांचा अवकाश असल्यानं विसर्जन पुढे ढकलण्याची शक्यता आहे.दरम्यान नवा अत्याधुनिक तराफा आणि भरतीची वेळ ही दोन्ही कारणं विसर्जनाला अडथळे निर्माण करत आहेत.

विसर्जनासाठी आणलेल्या नव्या तराफ्याची काय आहेत वैशिष्ट्ये ?

यंदा राजाच्या विसर्जनासाठी नवा आणि अत्याधुनिक स्वयंचलित तराफा मागवण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तराफ्याच्या तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा असून तो पूर्णपणे स्वयंचलित आहे. यापूर्वी विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने तराफा समुद्रात ओढून न्यावा लागत होता, पण आता या नव्या तराफ्यामुळे ती गरज भासणार नाही. या तराफ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात ३६० अंशामध्ये कुठेही वळण घेऊ शकतो, ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT