MNS alleges branding and favoritism at Lalbaugcha Raja mandal during Ganeshotsav. saam tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

Lalbaugcha Raja Row: लालबागचा राजा मंडळात गरबा खेळला जाईल, असा आरोप मनसेनं केलाय.. मात्र त्याचं कारण काय? देशपांडेंचे नेमके काय आरोप केलेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • लालबागचा राजा मंडळावर मनसेचे गंभीर आरोप.

  • श्रीमंत आणि सर्वसामान्य भाविकांमध्ये वेगळा न्याय दिल्याचा दावा.

  • उद्योगपतींकडून ब्रँडिंग सुरू असल्याचा आरोप.

लालबागचा राजा गणेश मंडळात आता गरबा पाहायला मिळेल, अशी जहरी टीका मनसेनं केलीय. त्याला कारण ठरलंय लालबागच्या राजाचं उद्योगपतींकडून सुरू असलेलं ब्रँडिंग. एवढंच नाही तर लालबागच्या राजा चरणी आयोजकांकडून सर्वसामान्यांना एक तर श्रीमंतांना वेगळा न्याय दिला जातोय.

ही दृश्य पाहा. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांना कशी वागणूक दिली जातेय. यामुळेच अनेक वर्षांपासून लालबागचा राजा मंडळाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जातोय.कधी कार्यकर्त्यांची तर कधी सुरक्षा रक्षकांकडून मुजोरी आणि धक्काबुक्की सुरु असते.

त्यात आता आणखी एक भर पडलीय ती म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या ढिसाळ नियोजनाची. पिढ्यान पिढ्या कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं तराफ्यामार्फत विसर्जन केलं जातं. मात्र यंदा गुजरातहून आणलेल्या नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

अखेर कोळी बांधवांचा मान उद्योगपतींना दिला गेल्याने हळुहळू या ब्रँडिंगचं लोण सगळ्याच गणेश मंडळांपर्यंत पोहचणार का आणि देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सवाची मराठी अस्मिता जपण्याऐवजी उद्योगपतींच्या वर्चस्वातून मराठी अस्मिता ठेचली जाणार. याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT