Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

Ganesh Visarjan Tragedy Ten People Drowned : महाराष्ट्रात गणेश विसर्जनाला दुःखद वळण मिळाले, वेगवेगळ्या ठिकाणी १० भाविक बुडाले. जळगावच्या निमखेडीमध्ये, २५ वर्षीय तरुण गिरणा नदीत वाहून गेला आणि त्याचे पालक असहाय्यपणे पाहत होते.
Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले
Published On
Summary
  • राज्यभरात गणेश विसर्जनावेळी १० जणांचा मृत्यू.

  • पाच ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या.

  • जळगावातील २५ वर्षीय तरुण गिरणेत वाहून गेला.

  • विसर्जनावेळी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन

भाविकांनी आज भक्तीभावाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. परंतु विसर्जनच्या वेळी दुख:द घटना घडल्या आहेत. राज्यभरातील ५ वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी विपरित घडलंय. १० जण पाण्यात बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. जळगावातील निमखेडी शिवारात आई-वडिलांच्या डोळ्यात देखत २५वर्षाचा तरुण गिरणा पात्रात वाहून गेलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गंगाधर कोळी हा तरुण गिरणा नदीपात्रामध्ये वाहून गेला. नदीपात्रात तरुणाचा शोध घेतला जात आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारातील नवीन बायपास लगत घडलीय. अनंत चतुर्दशीला, लाडक्या गणरायाला सर्वत्र निरोप दिला जात आहे. मात्र याचवेळी राज्यातील अनेक भागात गालबोट लागलंय.

ममुराबाद येथील कोळी कुटुंबदेखील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गिरणा नदी पात्रामध्ये गेले होते. या ठिकाणी गणेश कोळी हा तरुण गणपती मूर्ती घेऊन नदीपात्रात उतरला. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला.

या घटनेनंतर घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे दाखल झाले आहेत. तरुणाचा नदीपात्रामध्ये शोध घेतला जातोय. आई, वडील व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या डोळ्या समोर गणेश हा नदीपात्रात बुडाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले
IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

शहापूरात पाच जण बुडाल्याची घटना

दहा दिवसांनंतर गणरायाला निरोप देण्यात आला. पण गणेश विसर्जन दरम्यान दुर्दैवी घटना घडल्या आहेत. आसनगाव मुंडेवाडी येथील भारंगी नदी लगत असलेल्या गणेश घाट येथे पाच जण बुडाल्याची घटना घडली. यात दोन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले
Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

वाकी गावात दोनजण वाहून गेले

वाकी गावामध्ये प्रियदर्शन शाळेजवळ असलेल्या भामा नदीमध्ये दोन जण वाहून गेलेत. अभिषेक संजय भाकरे वय 21 वर्षे राहणार कोयाळी, आनंद जयस्वाल राहणार उत्तर प्रदेश वय 28 वर्षे अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांना एकाचा मृतदेह मिळालाय. तर दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. फायर ब्रिगेटरचे अधिकारी व कर्मचारी सर्च ऑपरेशन करत आहे.

शेल पिंपळगाव मध्ये घडली धक्कादायक घटना

शेल पिंपळगावात रवींद्र वासुदेव चौधरी वय 45 वर्ष हे चाकण येथील नदीत वाहून गेलेत. नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असता ते भाम नदीच्या पाण्यात बुडले.

विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

बिरदवडी येथे युवक गणेश विसर्जन करताना विहिरीमध्ये पडला. एनडीआरएफच्या पथकाने मृतदेह शोधलाय. संदेश पोपट निकम वय 35 असं विहिरीत पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com