Madhuri Shah Lalbaugcha Raja Viral Video Saam tv
मुंबई/पुणे

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्कादायक प्रकार! अभिनेत्रीने दान केलेले पैसे कार्यकर्त्यानेच पळवले; व्हिडिओ व्हायरल

Lalbaugcha Raja Darshan Madhu Shah Viral Video : अभिनेत्री मधु शाहच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचा VIDEO व्हायरल झाला आहे. बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या ५०० रुपयांबाबत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अभिनेत्री मधु शाहच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

  • मधु शाहने गणरायाच्या चरणी ५०० रुपयांची दक्षिणा अर्पण केली

  • त्यानंतर एका कार्यकर्त्याने ती रक्कम चोरल्याचा आरोप

  • या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली

संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे आगमन झाले की गल्ली बोळ्यांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण होते. ठिकठिकाणी लाडक्या गणपतीची स्थापना केली जाते. हे ५ ते ११ दिवस त्याची मनोभावे सेवा केली जाते. मुंबईतील मोठं मोठ्या मंडळांमध्ये हे ११ दिवस भक्तांच्या भक्तीने दुमदुमून जातात. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी सारख्या मंडळांच्या गणरायाच्या दर्शनासाठी अगदी दिवस रात्र लाईन पाहायला मिळते. मात्र मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या VIP कल्चरमुळे लालबागच्या राजाच्या दरबारातील कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि सेवा म्हणून जमेल तितकी देणगी गणरायाच्या चरणी श्रद्धेने अर्पण करतात. मात्र हे दान केलेले पैसे नक्की कोणाच्या खिशात जातायत? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार दृश्य संतापजनक आहे.

लालबागच्या राजाच्या दरबारात नेमकं काय घडलं?

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेत्री मधु शाह हिचा देखील समावेश आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीत काम केलेल्या मधु शाह हीचा लालबागचा राजाच्या दर्शनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मधु शाह हीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर बाप्पाच्या चरणी ५०० रुपयांची दक्षिणा अर्पण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, दर्शन घेऊन त्या पुढे जाताच तेथे उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने ही रक्कम उचलून बाजूला ठेवलेल्या कापडामध्ये लपवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी मिश्कील कमेंट्स केल्या.

आतापर्यंत लालबागच्या राजाचे कोणी घेतले दर्शन?

दरम्यान, यापूर्वीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले आहे. शाहरुख खानने पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानसोबत बाप्पाची आरती केली होती. रणवीर सिंहनेही आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्मापूर्वी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही बाप्पाचे दर्शन घेत पती राघव चड्ढा यांना व्हिडिओ कॉलद्वारे दर्शन घडवले होते. अभिनेता संजय दत्तही लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक झाला होता.

कोण आहे मधु शाह?

मधु शाहने १९९० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘फूल और कांटे’ (१९९१), ‘रोजा’ (१९९२), ‘अल्लारी प्रियुडु’ (१९९२), ‘योद्धा’ (१९९२) आणि ‘जेंटलमॅन’ (१९९३) यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT