lalbaug ganpati mandal announced help of raigad irshalgad landslide villagers Saam TV
मुंबई/पुणे

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीमधील ग्रामस्थांच्या मदतीला ‘लालबागचा राजा’ निघाला; आज मोठी मदत घेऊन रवाना होणार

Raigad Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा धावून आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raigad Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यात बुधवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. अजूनही जवळपास १०० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे. गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा धावून आला आहे.

इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याचा निर्णय लालबागचा राजा मंडळाने घेतला आहे. या भीषण दुर्घटनेमधून बचावलेल्या नागरिकांना लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठी मदत करणार आहेत.

ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे. दरम्यान, मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे. या वाडीत अंदाजे २५ ते २८ कुटुंबांचे वास्तव्य होते. दरम्यान या गावाचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT