Dombivali crime news AI Photo
मुंबई/पुणे

Dombivali News: जेवण सांडण्यावरून वाद टोकाला गेला, रागात मजुराने सहकाऱ्यालाच संपवलं; डोंबिवलीतील खळबळजनक घटना

Dombivali Laborer Killed Over Spilled Food: डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर मजूरांमध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर मजूराने सहाकाऱ्यालाच संपवलं.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

जेवण सांडण्याच्या किरकोळ कारणावरून मजूरांमध्ये वाद झाला. यात एका मजूराची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर घडली आहे. या घटनेनंतर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर मजूरांमध्ये वाद झाला होता. गुरूवारी रात्रीच्या सुमारास मजूरांनी जेवण बनवले होते. नंतर जयसान मांझी या मजुराने जेवण सांडले. जेवण सांडल्यावरून मजूर आणि त्याच्या सहकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. जयसान याला राग अनावर झाला.

वाद झाल्यानंतर सगळे मजूर झोपले होते. मात्र, वादामुळे जयसान संतापला. रागाच्या भरात त्यानं झोपलेल्या गौरव जगत या मजूराच्या डोक्यावर बांबूने वार केले. बांबूने वार केल्यामुळे गौरवला गंभीर दुखापत झाली होती. वार इतका जोरदार होता की, यात मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही मजूर मुळचे ओडीसा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच विष्णू नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. तसेच आरोपी जयसान मांझी याला अटक केली. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी जयसान मांझी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT