Visuals from Kundmala, Mawal where the old bridge collapsed into the swollen Indrayani river, sweeping away tourists. NDRF and police teams continue rescue efforts. Saam
मुंबई/पुणे

Mawal Tragedy: मृत्यूचा पूल कसा कोसळला? प्रत्यक्षदर्शींचाही काळजाचा ठोका चुकला; पर्यटक वाचवण्यासाठी ओरडत होते पण..

Kundmala Bridge Collapses in Mawal: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती. दोघांचा मृत्यू, सहा जखमी. एनडीआरएफ आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.

Bhagyashree Kamble

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळल्यानं पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले. आतापर्यंत ३८ जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आलं आहे. तर, २५ ते ३० जण नदी प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर सहा जखमी पर्यटकांवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारचा दिवस असल्यामुळे बरेच पर्यटक कुंडमळ्याच्या पुलावर गेले होते. ५० हून अधिक पर्यटक आणि गाड्या पुलावरून जात होते. दरम्यान, पुल जुना झाल्यामुळे पर्यटक आणि गाड्यांचे वजन पेलू शकलं नाही आणि काही क्षणात पूल खाली कोसळले. पूल कोसळल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकला. अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर त्यांनी आर्त हाक दिली. वाचवण्यासाठी मदतीचा हाताच्या प्रतिक्षेत होत्या.

घटनेनंतर स्थानिक पोलिस, ग्रामस्थ, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे. जखमींना रूग्णावाहिकेतून पवना रूग्णालयात नेण्यात आले. सध्या बचावकार्य सुरू आहे.

घटनास्थळी पोहोचलेले आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि बचावकार्याबाबत सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, “ही अतिशय गंभीर घटना असून सर्व यंत्रणा बचावासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.” या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, प्रशासनाने तातडीने सर्व जुन्या पूलांची तपासणी करून त्यांची देखभाल करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

SCROLL FOR NEXT