Koregaon Bhima Vijayastambh Saam TV
मुंबई/पुणे

Koregaon Bhima Vijayastambh: कोरेगाव भिमा विजयस्तंभ आकर्षक फुलांनी सजला; अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Pune News: कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभाला लाखो अनुयायांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

रोहिदास गाडगे

Salutation Ceremony:

भारताच्या इतिहासातील कोरोगाव भिमा हे एक शौर्याचे प्रतिक आहे. दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी १ जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. अशात यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच दर्शनी बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर आणखी दोन बाजूंनी संविधानाचे फोटो लावण्यात आलेत. मागच्या बाजूनेही फोटोसह आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभाला लाखो अनुयायांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यासाठी, पोलीसांसह आरोग्य सेवा,वाहतुक,पार्किंग, शौचायल अशा सर्व सुखसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्यात. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सर्व विभागांची स्वत: पहाणी करत आढावाही घेतलाय.

पोलीस आयुक्त,अधिक्षक पोलीस सहआयुक्त यांच्यासह ११ पोलीस उपायुक्त देखील कोरेगाव भिमा परिसरात बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तसेच ४२ सहाय्यक पोलीस आयुक्त, ८४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणच्या बंदोबस्तासाठी असणार आहेत.

वरिष्ठांच्या मदतीसाठी ३२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० होम गार्ड्स आणि SRPF च्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्यात. शिवाय आरोग्य सेवेसाठी २९ ठिकाणी आरोग्य कक्ष,५० रुग्णवाहिका, ९० तज्ञ डॉक्टर २०० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आलेत.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असणारा विजय स्तंभ ७५ फूट उंच आहे. त्यासाठी चारही बाजूंनी क्रेनच्या साहाय्याने साडे चार टन वजनाच्या विविध फुलांची सजावट करण्यात येत आहे. यामध्ये शेवंती, झेंडू, अष्टर, अशोकाचा पाला वापरण्यात आला असून, ही सजावट करण्यासाठी ४० कामगार दोन दिवस अहोरात्र कष्ट घेतायत.

विजयस्तंभाला तळाशी झेंडुंच्या फुलांच्या माळा, त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहकाऱ्यांसह फोटो, दोन बाजूंना अशोकाच्या पानांमध्ये द महार रेजिमेंटचा लोगो, त्यावर पांढऱ्या अष्टरची फुले व पिवळ्या झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT