pandhari sheth phadke death news Saam tv
मुंबई/पुणे

Pandhari Sheth Phadke : गाण्यापासून ते रील्स... 'छकडेवाला फेम' पंढरीशेठ फडके नेमके कोण होते? इतकी प्रसिद्धी कशी मिळाली?

Vishal Gangurde

Pandhari Sheth Phadke Today News :

पनवेलच्या विहिघर येथे राहणारे 'गोल्डमॅन' पंढरीनाथ शेठ यांचं निधन झालं आहे. पंढरीशेठ फडके यांचं बुधवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. पंढरीशेठ फडके यांच्या निधनाने पनवेलमध्ये शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

रायगडच्या पनवेल तालुक्यातील विहिघर येथे राहणारे पंढरीशेठ फडके हे मोठे बैलगाडा शर्यतप्रेमी होते. तसेच फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत संघटनेचे माजी अध्यक्ष होते. पंढरीशेठ फडके यांनी शेकाप पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे वडीलही बैलगाडा शर्यतप्रेमी होते. त्यामुळे त्यांनाही १९८६ सालापासून बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली. राज्यभरात त्यांच्या महागड्या कार आणि अंगावर किलोभर घातलेल्या सोन्याची जोरदार चर्चा असायची. सोशल मीडियावरही त्यांची खूप चर्चा असायची.

बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमाच्या गर्दीतही पंढरीशेठ फडके हे लोकांचं लक्ष वेधायचे. पंढरीशेठ यांच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्लू सारख्या महागड्या कारचे कलेक्शन होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण होते पंढरीशेठ फडके?

पंढरीशेठ (pandhari sheth phadke) हे पनवेलच्या विहिघरमध्ये राहायचे. त्यांच्या मालकीच्या अनेक बैल होते. त्यांचे वडील हे बैलगाडा शर्यतप्रेमी होते. त्यामुळे त्यांनाही पुढे बैलगाडा शर्यतीची आवड झाली. त्यामुळे ९० साली बैलगाड्यांचा जॉकी म्हणून बैलगाड्या पळविण्यास सुरुवात केली. त्यांनी मुंबईत होणाऱ्या बैलगाडा शर्यती प्रचंड गाजवल्या. यामुळे ते भरपूर चर्चेत आले.

प्रसिद्धी मिळविळ्यानंतर घाटात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीतही भाग घेण्यास सुरुवात केली होती. पुढे बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यानंतर त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करा, अशी मागणीही करण्यात फडके पुढे होते. (pandhari sheth phadke death news)

फडके यांनी ४ हजार ते १२ लाखापर्यंत किंमतीचे बैल शर्यतीसाठी विकत घेतले होते. राज्यभरात त्यांच्या बैलांनी मोठी बक्षीसे जिंकली होती. बैलगाडा शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने त्यांची बैल पाहायाला यायचे. ते रियल इस्टेट व्यावसायिक होते. काही वर्षांपूर्वी फडके यांचं सोशल मीडियावर 'बिनजोड छकडेवाला' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. (pandhari sheth phadke is no more)

त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या १०१० क्रमांकाच्या गाडीची भरपूर चर्चा व्हायची. त्यानंतर त्यांच्या गाण्याचे रिल्स देखील प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या हटके शैलीमुळे तरुणाईमध्येही पंढरीशेठ फडके यांची प्रचंड लोकप्रियता होती. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्री मारणारे पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूने बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. (pandhari shet phadke bailgada sharyat)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT