Pandhari Sheth Phadake: बैलगाडा शर्यत प्रेमी 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके यांचं निधन

Pandharinath Sheth Phadake Death News: पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
Panvel News: Pandharinath Sheth Phadake Passed Away | Saam TV Marathi News
Panvel News: Pandharinath Sheth Phadake Passed Away | Saam TV Marathi News Saam Tv Marathi News
Published On

Pandhari Sheth Phadake Passed Away:

गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालंआहे. पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना  हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

Panvel News: Pandharinath Sheth Phadake Passed Away | Saam TV Marathi News
Manoj Jarange Andolan: मोठी बातमी! मनोज जरांगे आता थेट दिल्लीत आंदोलन करणार? शिंदे सरकारचं टेन्शन वाढणार!
Panvel News: Pandharinath Sheth Phadake Passed Away | Saam TV Marathi News
Ameen Sayani : रेडिओवरील 'गीतमाला'तील 'सूरमणी' हरपला! आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचं मुंबईत निधन

मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Panvel News: Pandharinath Sheth Phadake Passed Away | Saam TV Marathi News
Maratha Protest : मनोज जरांगेंचं ठरलं! २४ फेब्रुवारीपासून पुन्हा मराठा आंदोलन; कशी असेल आंदोलनाची दिशा? जाणून घ्या

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा 'बैल'मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.

पंढरीशेठ यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज होती. पंढरीशेठ जिथे असतील तिथे गर्दी आपोआप जमायची. पंढरीशेठ यांच्या हटके डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पंढरीशेठ यांच्यावर बरीच गाणी देखील बनली होती. लोकप्रिय असलेल्या पंढरीशेठ यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com