विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मंगळवारी एकूण 14 जणांनी अर्ज दाखल केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव अर्थात मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवून निवडणूक अटळ केली. त्यामुळे या निवडणुकीत फोडाफोडी होणार हे अटळ आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलीये. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्याआड बऱ्याच हालचाली सुरु आहेत.
सध्याचं विधानपरिषदेसाठीचं गणित पाहिल्यास काँग्रेसकडे 37 आणि शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा काँग्रेसमधील अंतर्गत मतफुटीमुळे पराभव झाला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काही आमदार पक्षाबरोबर नसल्याचं गृहीत धरून खबरदारी घेत प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलीये.. तर ठाकरेंनी नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखलीये..
ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मतं.
नार्वेकरांना 8 मतांची गरज.
काँग्रेसकडील अतिरिक्त मतं नार्वेकरांना मिळावित यासाठी प्रयत्न.
काँग्रेस,शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकरांना द्यावीत.
शिंदे गटातील आमदारांशी नार्वेकरांचे वैयक्तिक संबंध.
शिंदे गटातून नार्वेकरांना मदतीची शक्यता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता.
कोण आहेत नार्वेकर ?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे सचिव असून ते त्यांचे अत्यंत विश्वासू आहेत. उद्धव ठाकरेंची सावली म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. सचिव मिलिंद नार्वेकरांवर एकही गुन्हा दाखल नाही. नार्वेकर यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, ते 10 वी पास आहेत.
मिलिंद नार्वेकरांकडे किती संपत्ती
रोख रक्कम
मिलिंद नार्वेकरांकडे 45 हजार रोख,
पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम
बँके खात्यातील ठेवी
74 लाख 13 हजार 243 रुपये रक्कम,
पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रुपये रक्कम
बॉण्ड्स आणि म्युचल फंड
नार्वेकरांच्या नावे 50 हजार,
पत्नीच्या नावे 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये
पोस्ट ऑफिस, इतर पॉलिसीमधील गुंतवणूक
नार्वेकरांच्या नावे 3 लाख 68 हजार 729 रुपये
पत्नीचे 67 लाख 88 हजार 558 रुपये
वैयक्तिक कर्ज
नार्वेकरांच्या नावे 26 लाख 38 हजार 160 रुपये,
पत्नीच्या नावे 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये
बँक लोन
नार्वेकरांच्या नावे 1 कोटी 54 लाख 81 हजार 989 रुपये,
पत्नीवर 38 लाख 94 हजार 807 रुपये कर्ज
नार्वेकरांच्या नावे कोणतेही वाहन नाही
दागिने
एकूण दागिन्यांची किंमत - 71 लाख 28 हजार 189
पत्नीकडील एकूण दागिन्याची किंमत - 67 लाख 61 हजार 420
शेयर्समधील गुंतवणूक
श्री बालाजी कॉम. LLP कंपनीत 50 टक्के शेयर्स तर पत्नीचे 50 टक्के शेयर्स
अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट, अशोक लेयलँड, एशियन पेंट्स, IDBI बँक, ICICI बँक आणि इतर शेयर्स
स्थावर मालमत्ता
रत्नागिरीत 74.80 एकर जमीन, पत्नीचा 50 टक्के हिस्सा
बंगळूरमध्ये पत्नीच्या नावे 2 हजार 325 स्क्वेअर फुट जमीन
मुंबईतील मालाड आणि बोरिवलीत 1000 स्क्वेअर फुटाचं घर,
पत्नीच्या नावे अलिबागमध्ये एक फार्म हाऊस
कुबेराधीश मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या मैदानात उतरल्यानं निवडणुकीत चुरस वाढलीये. दुसरीकडे आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनीही व्यक्त केलाय. त्यामुळे पराभूत होणारा म्हणजेच '12 वा' उमेदवार कोण असेल, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.