Anil Parab News, Kirit Somaiya News, Kirit Somaiya on Anil Parab Saam Tv
मुंबई/पुणे

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ? दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे CM शिंदेंचे आदेश

शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) नेते आमदार अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. आमदार परब यांची ईडीने (ED) चौकशी केली होती.

अनिल परब यांचे रिसॉर्ट पोडण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारने हा रिसॉर्ट बेकायदेशीर घोषित केला होता. सरकारने हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते, पण हा रिसॉर्ट पाडले नव्हते. शनिवारी मी दापोलीमध्ये जाणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

हे देखील पाहा

या रिसॉर्टची घरपट्टी अनिल परब (Anil Parab) नेहमी भरतात. त्यामुळे हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. कोविड काळात लोक घरी होते पण अनिल परब दापोलीत रिसॉर्ट बांधण्यात व्यस्त होते, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर कोणतीही कारवाई केली नव्हती, पण आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत, असंही सोमय्या म्हणाले. गेल्या काही दिवसापूर्वी परब यांची ईडीने चौकशी केली आहे. सलग दोन दिवस त्यांची चौकशी सुरू होती. तर दुसरीकडे अनिल परब यांनी या रिसॉर्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

IAS अधिकाऱ्यांचे काम काय असते?

Shocking Crime: बड्या व्यापाऱ्याला घेरलं अन् १०-१२ गोळ्या झाडल्या; लॉरेन्स गँगनं घेतली हत्येची जबाबदारी

Dry Clothes Without Sun : उन्हाशिवाय कपडे कसे वाळवायचे?

SCROLL FOR NEXT