भाजपवाल्यांना कळालंय मुंबईत बाळासाहेबांचं नाव चालतं, मोदींचं नाही - उद्धव ठाकरे

भाजपसोबत जाऊन शिवसेना सडली यांनी फक्त आपला उपयोग करून घेतला - ठाकरे
Uddhav Thackeray Vs BJP
Uddhav Thackeray Vs BJPSaam TV
Published On

निवृत्ती बाबर -

मुंबई: बुलेट ट्रेन हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं का? आरेची वाट लावून कारशेड उभारणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं का? मुंबईत बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray) नाव चालतं मोदींचं चालत नाही. हे तुम्हाला आता कळलं आहे.

असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केला. ते मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव काल षण्मुखानंद सभागृहात पार पडला यावेळी बोलत होते.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'दिल्ली मिळाली आता यांचा डोळा मुंबईवर आहे. विधान भवनात एक घोषणा करण्यात आली '50 खोके एकदम ओके' हे तुम्ही सुद्धा आता बोलताय मी बोलत नाही लोकांना सर्वकाही आता ठाऊकक झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

आमच्या सरकारला तीन चाकी म्हटलं जात होतं, आता यांचं सरकार दोन चाकी आहे. हे ईडी सरकार किती काळ चालेल माहित नाही, यांचा जन्मच खोक्यांपासून झाला आहे. तर जनता विश्वास कशी ठेवणार? सरकार पुढे चालू शकणार नाही असं म्हणाले.

कोरोना काळात तुमची सुद्धा साथ लाभली आता बोलणारे बोलू द्यात अडीच वर्षात यांनी काही केलं नाही मग महाराष्ट्र सावरला कोणी मुंबईचं (Mumbai) महाराष्ट्राचे कौतुक देशभर झालं. विधान भवनात एक घोषणा करण्यात आली '50 खोके एकदम ओके' हे तुम्ही सुद्धा आता बोलताय मी बोलत नाही.

लोकांना सर्वकाही आता ठाऊक झालं आहे. आमच्या सरकारला तीन चाकी म्हटलं जात होतं, आता यांचं सरकार दोन चाकी आहे. हे ईडी सरकार किती काळ चालेल माहित नाही . या सरकारचा जन्मच खोक्यांपासून झाला तर जनता विश्वास कशी ठेवणार सरकार पुढे चालू शकणार नाही.

Uddhav Thackeray Vs BJP
महाराष्ट्रात शिवसेनेचे झाले, तेच दिल्लीत आपचे होण्याची शक्यता; काही आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर

अनेक तरुण आता चांगले बनत आहेत पण त्यांच्यासाठी देशात पोषक वातावरण नाही हे सत्ता पिपासू लोक आहेत. यांना फक्त सत्ता हवी आहे. आपण काही केलं तर लोकशाहीचा खून होतो यांनी काही केलं तर सर्व ओके, आम्ही सोयरीक बोलून जुळवली होती. सकाळचा शपथविधी केला नव्हता तो शपथविधी यशस्वी झाला असता तर सर्व ओके होतं. आम्ही काही केलं म्हणून हे केवढं मोठं पाप आहे हे त्यांना वाटू लागलं.

दिल्ली मिळाली आता यांचा डोळा मुंबईवर आहे, यासाठी ते लढतात मी देखील मैदानात उतरलेलो आहे. आता काही सोडणार नाही. लवकरच गटप्रमुखांचा मेळावा घेतला जाईल. मी अनेक वेळा बोललो की, भाजपसोबत जाऊन शिवसेना (Shivsena) सडली यांनी फक्त आपला उपयोग करून घेतला असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

मुंबईत महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाशिवाय मतं मिळू शकत नाहीत, म्हणून हे बोलत आहेत आता बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबई तयार करायची आहे. बुलेट ट्रेन बाळासाहेबांचे स्वप्न होतं का आरेची वाट लावून कार शेड उभारणं हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं का?

मुंबईत बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं चालत नाही हे तुम्हाला आता कळालेला आहे. आमदार चोरायचे खासदार चोरायचे एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख चोरायचा मग हा तुमचा पक्ष आहे की चोर बाजार आहे असा टोला लगावत यावर्षीचा दसरा मेळावा जाहीर शिवाजी पार्क मध्ये होईल असंही ठाकरे म्हणाले.

Edited by - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com