Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: रश्मी ठाकरेंनी 19 बंगल्यांचा Property Tax भरला; सोमय्यांनी पावती सादर करत दिलं प्रत्युत्तर

काल वार, आज पलटवार; राऊतांच्या आरोपांना सोमय्या प्रत्युत्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल आहे असा केला आहे. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, ईडीच्या (ED) धाडी पडणार आहेत, असे राऊत म्हणाले होते. तर मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सोमय्यांनी ते 19 बंगले दाखवावे नाही तर शिवसैनिक जोड्याने मारणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वी यावर किरीट सोमय्या यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत असताना म्हणाले की, "२०१७ साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता माझ्या मुलाचे नाव घेतले आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध १० खटले दाखल केले आहेत तर अजून ३ खटले पाईपलाईनमध्ये आहेत. मला त्यांची परिस्थिती समजत आहे. मी आणखी एका प्रकरणाचे लवकरच स्वागत करणार आहे. आम्ही काही चुकीचे केल नाही. कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेले नाही.

हे देखील पहा-

संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे मला लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे दाखवावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असे देखील सोमय्या यांनी यावेळी म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी माझ्याविषयी काही आरोप केले आहेत. माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले आहेत. १९ बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असे ते म्हणाले, पण नेमके कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या यांनी यावेळी म्हणाले आहेत.

२०१३ ते २०२१ या काळामध्ये सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरे नाही तर घरपट्टी का भरत आहात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले आहेत. यावेळी बोलत असताना किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला कर भरला होता. यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल देखील सोमय्या यांनी यावेळी केला आहे. त्यासंबंधीत तक्रार देखील करण्यात आला आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करत आहात असा प्रश्न देखील सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांना केला आहे.

दरम्यान, यावेळी किरीट सोमय्या यांनी कोवीड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. कोवीड सेंटरमधील घोटाळ्याच्या चौकशीची भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. मी महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेकरिता लढत आहे. मला जर ब्ल्ॅकमेलर म्हणत असतील तर हे चुकीचे आहे असे सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT