Sanjay Raut: "बाप बेटे जेलमध्ये जाणार! Wait and watch; कोठडीचे sanitization सुरू आहे'; संजय राऊतांच खोचक ट्विट

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे संजय राऊत यांच्या निशाणा साधला होता. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर भाजपकडून देखील संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Sanjay Raut Tweet Viral)

हे देखील पहा-

यानंतर आज संजय राऊत यांनी एक खोचक ट्विट केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी एक खोचक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, "बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!" असे संजय राऊत यांनी खोचक ट्विट केले आहे. हे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या याच्या संदर्भामध्ये आहे की अन्य दुसऱ्या कोणाविषयी? आता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या या दोघांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजपचे दलाल लोक, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कुटुंबीयांचे प्रकरण बाहेर काढत आहे. पण फडणवीस सरकारच्या काळात सर्वात मोठा घोटाळा करण्यात आला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? सर्वांची खाती, बँकेतील व्यवहार, कुणाला कंत्राट दिले आहे? असा सवाल राऊत यांनी काल करण्यात आला होता.

Sanjay Raut
Kirit Somaiya: रश्मी ठाकरेंनी 19 बंगल्यांचा Property Tax भरला; सोमय्यांनी पावती सादर करत दिलं प्रत्युत्तर

तसेच, राकेश वाधवानी याने भाजप पक्षाला २० कोटी रुपये दिले होते. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये राकेश वाधवाणी याचे नाव समोर आले होते. किरीट सोमय्या हे राकेश वाधवानी याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. पण, निकॉन इन्फ्रास्ट्रकचर कंपनी कुणाची आहे. की कंपनी किरीट सोमय्यांची आहे. त्यांचा मुलगा नील सोमय्यांची आहे. निकॉन कंपनीकरिता पीएमसी बँकेच्या घोटाळ्यात पैसा वापरला असणार आहे. वसईमध्ये गोखीवरे तालुक्यात हजारो कोटींचा प्रकल्प उभा करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी यावेळी काल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com