Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांची 'डर्टी डझन' लिस्ट जाहीर; अटकेसाठी आता कोणाचा नंबर?

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (government) चांगलीच टीकास्त्र सोडले आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर (arrest) किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावे जाहीर केले आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिक यांच्या नंतर अटकेकरिता कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोर्टात टाकला आहे.

हे देखील पहा-

पत्रकार विचारत असताना आता कुणाचा नंबर, पण त्याकरिता चिट्ठी काढावी लागणार आहे. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला अगोदर तुरुंगामध्ये पाठवायचे हे त्यांनी ठरवावे, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईमध्ये केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना सोमय्या यांनी सांगितले आहे की, महाविकास आघाडीचे नेते कितीवेळेस असे आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यावर अगोदरच तपास आणि कारवाई सुरू आहे.

या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांविषयी निर्णय आला आहे. त्यामध्ये अनिल परब देखील आहेत आणि त्यांच्यावर अगोदरच प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमय्यांनी जाहीर केलेल्या नेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे. अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची नवे यादीमध्ये जाहीर केले आहेत.

मी काही संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन २ ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचे नाव संजय राऊत सांगू शकणार नाहीत. कुठे आहे वाधवान? अशी फडतूस नाटके आणि नौटंकी उद्धव ठाकरे यांची माणसे करत आहेत. आम्ही कागदपत्रावर असलेले सांगत असतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला अगोदर तुरुंगात पाठवायचे आहे, असे सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT