Sleeping Position: डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे जाणून घ्या !

चांगल्या आरोग्याकरिता झोपणे जितके आवश्यक आहे. तितक्याचं प्रमाणात झोप ही अतिशय महत्त्वाची आहे.
Best Positions for Sleeping
Benefit of sleeping on the left couch
Best Positions for Sleeping Benefit of sleeping on the left couchSaam Tv
Published On

चांगल्या आरोग्याकरिता झोपणे जितके आवश्यक आहे. तितक्याचं प्रमाणात झोप ही अतिशय महत्त्वाची आहे, आणि झोपण्याची शैली. होय, आपल्याला झोपण्याची दशा आणि दिशा ठरवतं असते, आपले आरोग्य. तसे तर लोकं स्वत:ला आरामदायक वाटणार्‍या स्थितीत झोपणे (Sleeping) पसंत करत असतात. पण डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत. बघू या काय आहे ते फायदे. (Benefit of sleeping on the left couch)

-डाव्या कुशीवर झोपणे आपल्या आरोग्याकरिता (health) फायद्याचे आहे. यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्यामुळे हृदय योग्य पद्धतीने काम करत असते. यामुळे हृदयाचे (heart) आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते. (Learn benefits sleeping on left couch)

हे देखील पहा-

- शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होत असतो. यामुळे शरीराचे सर्व अंग निरोगी राहत असते आणि चांगल्या प्रकारे कार्य करत असते.

-गर्भवती स्त्रियांकरिता डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे. कारण यामुळे गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हात आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होत असते.

-डाव्या बाजूला झोपण्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होत असते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्या देखील दूर होत असते.

Best Positions for Sleeping
Benefit of sleeping on the left couch
Ukraine-Russia War: भारतीयांच्या मदतीकरिता सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर !

-या प्रकारे झोपल्यामुळे पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूला झोपल्यामुळे शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडत असतात.

-बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. कारण आपल्याला आराम मिळत असते. गुरुत्वाकर्षणाने अन्न लहान आतड्यामधून मोठ्या आतड्यात पद्धतशीर पुढे ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होते.

-या प्रकारे झोपल्यामुळे पोटातील अॅसिड वर न जाता खाली येते, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होत असतात.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com