Ukraine-Russia War: भारतीयांच्या मदतीकरिता सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर !

रशियाने युक्रेनवर हल्ला करत युद्धाला सुरुवात चांगलीच केली आहे.
Ukraine-Russia War: भारतीयांच्या मदतीकरिता सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर !
Ukraine-Russia War: भारतीयांच्या मदतीकरिता सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर !Saam Tv
Published On

वृत्तसंस्था: रशियाने युक्रेनवर हल्ला (Russian Ukraine War) करत युद्धाला सुरुवात चांगलीच केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी या हल्ल्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अजून देखील हजारो भारतीय अडकले आहेत, अडकलेल्या भारतीयांच्या मदतीकरिता भारत सरकारने २४ तास हेल्पलाइन सुरू केली आहे.

हे देखील पहा-

यापूर्वीच भारतीयांना मायदेशी परत आणण्याकरिता युक्रेनला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला अर्ध्या वाटेमधून परतले आहे. यामुळे युक्रेनमध्ये अजून देखील अंदाजे २० हजाराहून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. दरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेन मधील तणाव तत्काळ कमी करण्याचे आवाहन केले आहे. ही परिस्थिती न बदलल्यास हे संकट मोठ्या संकटात बदलू शकणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये सैन्य पाठवू नये आणि समस्या शांततेने सोडवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. युक्रेन- रशिया (Ukraine-Russia) यांचा वाद आणखी चिघळल्यावर भारत सरकारने (Indian government) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेकरिता मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी एअर इंडियाचे (Air India) विमान AI१९४६ ने कीव येथून उड्डाण केले होते.

Ukraine-Russia War: भारतीयांच्या मदतीकरिता सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर !
राजधानी कीव्हमध्ये रशियाकडून बाँम्ब हल्ले; भारतीय 20 हजार कुटुंबियांना मार्गदर्शक सूचना जारी

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान रात्री ११.४५ च्या सुमारास दिल्ली येथे पोहोचले आहे. या विमानामधून युक्रेनमध्ये (Ukraine) राहणाऱ्या २४२ भारतीयांना आणण्यात आले आहे. एअर इंडियाच्या विमानाने (Air India flight) भारतात (India) पोहोचलेल्या लोकांचे स्वागत करण्याकरिता त्यांचे नातेवाईक अगोदरच विमानतळावर पोहोचले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com