Gangster Gaja Marne Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली २० कोटींची खडणी; गुंड गजा मारणेवर गुन्हा दाखल

Gangster Gajanan Marne News: या व्यवसायिकाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे, मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, पुणे

पुणे: कुविख्यात गँगस्टर गजा मारणे (Gajanan Marne) आणि त्याच्या गॅंगवर एका तरुण व्यवसायिकाचे भरदिवसा अपहरण करून २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवसायिकाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे, मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

शेअर मार्केटच्या व्यवहारातील पैशावरुन हे अपहरण (Kidnapping) झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एका महिलेसह गजा मारणे, पप्पू घोलप, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, रुपेश मारणे आणि त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोण आहे गजा मारणे?

गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली.

गजा मारणेचा मुलगाही टवाळखोर

कुख्यात गुंड गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश मारणे (Prathamesh Marne)हा देखील काही कमी नाही. २३ मार्च २०२२ ला त्याच्यावर पुण्यात (Pune) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे आणि पीडित तरुणी गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी आरोपीने काही व्हिडिओ तयार केले होते. तसेच पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही या तक्रारीत सांगण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये आणखी एका बाळाचा मृत्यू

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT